---Advertisement---
राजकारण

मुक्ताईनगरात शिवसेनेचा खडसेंना धक्का, १० नगरसेवक सेनेच्या वाटेवर

shivsena bjp
---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । २६ मे २०२१ । राज्यात शिवसेनेकडून भाजपला दे धक्का देण्याचे सत्र सुरूच असून संकटमोचक गिरीश महाजन यांना त्यांच्याच जिल्ह्यात शह देण्याचा प्रयत्न सुरु आहे. जळगाव मनपात सत्ता काबीज केल्यानंतर शिवसनेने आपला मोर्चा मुक्ताईनगरकडे वळविला असून भाजपचे सात विद्यमान तर 3 माजी नगरसेवक भाजपाला रामराम करत शिवसेनेत दाखल होत आहे.

shivsena bjp

हे दहा नगरसेवक मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वर्षा निवासस्थानी पोहचले आहे. त्यांच्यांसोबत पालकमंत्री गुलाबराव पाटील व आमदार चंद्रकांत पाटील हे आहेत. मुक्ताईनगरातील भाजपचे नगरसेवक शिवसेनेत गेल्याने भाजपच्या खासदार रक्षा खडसे यांना देखील हा धक्काच आहे. पियुष मोरे, बबलू कोळी, मुकेश वानखेडे, ललित महाजन तर नगराध्यक्षा नजमा तडवी सह अन्य जणांचा समावेश आहे

---Advertisement---

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---