Jalgaon : मुक्ताईनगरच्या शिक्षक दांपत्याच्या वाहनाचा भीषण अपघात, एकाच मृत्यू, तिघे जखमी

फेब्रुवारी 24, 2025 5:24 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । राष्ट्रीय महामार्ग सहा वर होणाऱ्या अपघाताच्या घटना वाढताना दिसतात असून अशातच एरंडोल ते जळगाव दरम्यान नॅशनल हायवेवर युपी ढाब्यासमोर अपघात झाला. यात शिर्डी येथून साईबाबाचे दर्शन घेऊन मुक्ताईनगरला परत जाणाऱ्या शिक्षक दांपत्याच्या वाहनाचा अपघात झाला असून त्यात पत्नीचा जागेवरच मृत्यू झाला. पतीसह तीन मुले गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर एरंडोल ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या संदर्भात एरंडोल पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

erandol AC

या घटनेबाबत असे की, मुक्ताईनगर येथील शिक्षक राजेश वासुदेव पाटील (वय 46) हे पत्नी रुपाली पाटील (वय 40) आणि तीन मुलांसह शिर्डीला देवदर्शनासाठी गेले होते. सोमवार (दि.24) रोजी मध्यरात्री 12.30 वाजता मुक्ताईनगरकडे परतताना, एरंडोल ते जळगाव दरम्यान नॅशनल हायवेवर युपी ढाब्यासमोर अचानक आलेल्या कंटेनर क्रमांक WB-23-F9472 ला मारुती स्विफ्ट कार क्रमांक MH-19-CQ-7009 ने जात असताना रस्त्यावर अचानक कार कंटेनरला मागून धडकली.

Advertisements

धडकेनंतर कार रस्त्याच्या डिव्हायडरवर आदळली. या भीषण अपघातात राजेश पाटील, त्यांच्या पत्नी रुपाली पाटील आणि तीन मुले खुशी, स्वरा आणि गुरु हे सर्व जण गंभीर जखमी झाले आहेत.अपघातानंतर रस्त्यावरून जाणाऱ्या प्रवाशांनी तत्काळ मदतकार्य केले. रुग्णवाहिकेद्वारे जखमींना एरंडोल येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मात्र, उपचारादरम्यान डॉक्टरांनी रुपाली पाटील यांना मृत घोषित केले. त्याचवेळी तीन मुलांना एरंडोल येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Advertisements

कंटेनर चालकाच्या निष्काळजीपणामुळे अपघात?
राजेश पाटील यांनी एरंडोल पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. दिलेल्या फिर्यादीनुसार, कंटेनरचालकाने रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून अचानक वाहन रस्त्यावर आणल्यामुळे अपघात घडला आहे. त्यांच्या पत्नीच्या मृत्यूला आणि मुलांच्या दुखापतीस कंटेनरचालकच जबाबदार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment