जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून पोलीस दलासाठी मंजूर करण्यात आलेल्या चारचाकी वाहनांचा ताफा पालकमंत्र्यांच्या हस्ते शुक्रवारी सुपूर्द करण्यात आला होता. यात 14 चारचाकी वाहनांचा समावेश होता तर उर्वरित 15 वाहने व 70 दुचाकी दोन-तीन महिन्यात पोलीस दलात दाखल होतील.
पालकमंत्री ना गुलाबराव पाटील यांना आमदार चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या विनंती नुसार मुक्ताईनगर पोलीस स्टेशनला एक नवीन बोलेरो कार आज दि.०६ एप्रिल रोजी प्राप्त झाली. सदरील नवीन वाहनाचे आमदार पाटील यांच्या हस्ते लोकार्पण व पूजन करण्यात आले.
यावेळी मुक्ताईनगर पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक सुरेश शिंदे, उपनिरीक्षक निलेश सोळुंके, शिवसेना तालुका प्रमुख छोटू भोई, शेमळदे माजी सरपंच दिलीप पाटील सर, नगरसेवक तथा गटनेते राजु हिवराळे, माजी उपतालुका प्रमुख प्रशांत भालशंकर, शिवसेना विभाग प्रमुख महेंद्र मोंढाळे आदी शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते.