मुक्ताईनगर पोलिसांची मोठी कारवाई : 15 लाखांचा गुटखा केला नष्ट
जळगाव लाईव्ह न्यूज । २५ मे २०२२ । मुक्ताईनगर पोलिसांनी संपूर्ण जिल्ह्याला अभिमान वाटेल अशी कारवाई केली आहे. यावेळी त्यांनी न्यायालयाच्या आदेशानंतर सुमारे 15 लाखांचा गुटखा पंचांसमक्ष नष्ट केला. खामखेडा रस्त्यावरील डंपींग ग्राऊंडवर हा मुद्देमाल नष्ट करण्यात आला.
अधिक माहिती अधिक कि , तालुक्यातील अंतुर्ली-बर्हाणपूर रस्त्यावर 4 ऑक्टोंबर 2021 रोजी रात्री 11 वाजेच्या सुमारास नाशिक आयजींच्या पथकाने एका बोलेरो गाडीतून अवैधरीत्या वाहतूक होणारा 14 लाख 96 हजारांचा गुटखा जप्त केला होता. या गुन्ह्यात दोघांना अटक तर एक पसार झाला होता. मुक्ताईनगर पोलिसांनी जप्त मुद्देमाल नष्ट करण्याबाबत न्यायालयाकडे परवावनगी मागितली होती. त्यानुसार आदेश मिळताच सोमवार, 23 मे रोजी पोलिीस निरीक्षक शंकर शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक प्रदीप शेवाळे, हवालदार मोतीलाल बोरसे, सुरेश पाटील यांच्या नगरपंचायतीचे कर्मचारी किशोर महाजन, सुनील चौधरी यांच्यासमक्ष हा मुद्देमाल नष्ट करण्यात आला.