जळगाव जिल्हा

वृषभ राजाचे ऋण व्यक्त करण्याचा, भुतदयेची शिकवण देणारा दिवस म्हणजे बैल पोळा – रोहिणी खडसे

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २ सप्टेंबर २०२४ । बैलपोळा सण शेतकऱ्यांसाठी अंत्यत उत्साहाचा असतो. शेती व्यवसाय मोठ्या प्रमाणात बैलांवर अवलंबून आहे. त्यामुळे वर्षभर शेतात सेवा देणाऱ्या शेतकऱ्यांचा साथीदार असलेल्या वर्षभर घेत असलेल्या अमूल्य मेहनती बद्दल बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी बैलपोळा उत्साहात साजरा केला जातो. राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा ॲड. रोहिणी खडसे यांनी कोथळी येथे बैलपोळ्या निमित्त बैलांचे पुजन करून बैलांना पुरण पोळीचा नैवद्य खाऊ घातला, व शेतकरी बांधवांना सुगीचे दिवस येऊं दे अशी प्रार्थना केली.

यावेळी ॲड. रोहिणी खडसे म्हणाल्या आपला देश कृषीप्रधान असून शेती हा अर्थव्यवस्थेचा कणा आहे शेतकरी बांधव आपल्या शेतात राबून काळ्या आईची सेवा करून धान्य पिकवत असतात त्यांना या कार्यात बैलांची मोलाची साथ लाभते वर्षभर शेतात राबून घेत असलेल्या मेहनती बद्दल वृषभ राजाचे ऋण व्यक्त करण्याचा, भुतदयेची शिकवण देणारा दिवस म्हणजे बैल पोळा.दरवर्षी आम्ही कोथळी येथे वृषभ राजाचे पुजन करतो सालाबाद प्रमाणे यावर्षी सुध्दा वृषभ राजाचे पुजन करून त्यास पुरण पोळीचा नैवद्य खाऊ घातला

व पिक पाणी व्यवस्थित होऊन शेतकरी बांधवांना सुगीचे दिवस येऊं दे अशी वृषभ राजा कडे प्रार्थना केल्याचे ॲड.रोहिणी खडसे यांनी सांगितले. तसेच सध्या पावसाळ्याचे दिवस असुन पशुधनावर वेगवेगळे आजार येतात म्हणुन वर्षभर आपल्या सोबत शेतात राबणाऱ्या सर्जा राजा आणि इतर पशुधनाचा या आजारांपासून बचाव व्हावा यासाठी शेतकरी बांधवांनी पशुधनाला लसीकरण करून योग्य ती काळजी घ्यावी असे आवाहन ॲड.रोहिणी खडसे यांनी शेतकरी बांधवांना केले. यावेळी मंदा ताई खडसे, डॉ प्रांजल खेवलकर, सरपंच नारायण चौधरी आणि पदाधिकारी, ग्रामस्थ उपस्थित होते.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button