⁠ 
शुक्रवार, एप्रिल 26, 2024

भुसावळ येथे छत्रपती संभाजी महाराज बलिदान दिनानिमित्त मुकपदयात्रा

जळगाव लाईव्ह न्यूज । २ एप्रिल २०२२ । भुसावळ येथील शिवप्रतिष्ठान व शिववंदना परीवारतर्फे ४० दिवस बलिदान मशाल मानविण्यात आला. यात दररोज सायंकाळी छत्रपती संभाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून शिववंदना केली जाते.

1 एप्रिल रोजी सायंकाळी 7 वाजता दीनदयाळ नगर येथुन मूक पदयात्रा काढण्यात आली. ही पदयात्रा अष्टभुजा मंदिर येथून परत येऊन समारोप संपन्न झाला. पदयात्रेत अग्रस्थानी भगवा ध्वज, छत्रपती संभाजी महाराजांची प्रतिमा व मशाल लावून रॅली काढण्यात आली. यात सुमारे २०० लोकांचा या पदयात्रेत सहभागी झाले होते.