बातम्या

मे महिन्यात मुहूर्त नाही ; येत्या दोन महिन्यात विवाह उरकण्याची लगबग

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । 7 फेब्रुवारी 2024 । पौष हा एक भारतीय पंचांगानुसार वर्षातील दहावा महिना आहे. हा महिना तीस दिवसाचा असतो. साधारणतः पौष महिना हा ग्रेगोरियन कैलेंडरच्या डिसेबर आणि जानेवारी महिन्यात येतो. पूर्वीच्या काळापासून पौष महिन्यात शुभ कार्य न करण्याचा प्रघात आहे. या महिन्यात लग्नाव्यतिरिक्त, साखरपुडा, नवीन घराची घरभरणी, नवीन विहिर व घराचे बांधकाम करणे, इत्यादी शुभ कार्य करण्यास वर्ग मानने जाते. तर पौष महिन्याला अध्यात्मिक दृष्ट्या विशेष महत्त्व असल्याने या महिन्याला शुभ मानले जाते. या महिन्यात सूपाची उपासना केल्याने तुमच्या जीवनावर सकारात्मक आणि आशादायक परिणाम होऊ शकतात. व शुभ फळ मिळते. असेही मानले जाते, पण यावर्षी में महिन्यात शुभ कार्यासाठी मुहूर्त नाहीत

त्यामुळे एप्रिल पर्यंत असलेला मुहूर्त पहिला जात आहे. त्यामुळे पौष महिन्यातील मुहूर्त साधण्याचा प्रयत्न सुरू आहे. पौष महिना १२ जानेवारी पासून सुरू झाला असून दि. ८ फेब्रुवारी पर्यंत आहे. १६ जानेवारी पासून लग्नाचे मुहूर्त सुरू झाले आहेत. यावर्षी पौष महिन्यात लग्नाचे १७ मुहूर्त होते. सकाळी, दुपारी गोरख मुहूर्त साधण्यासाठी यजमानांची लगबग सुरू आहे. विविध पंचांगांतील आपत्कालीन मुहूतांचा अनुषंगाने एखादा मुहूर्त निश्चित करून या दिवशी लग्नसोहळा उरकून घेण्यावर वर-वधू पक्षाचा कल आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button