⁠ 
रविवार, डिसेंबर 15, 2024
Home | जळगाव जिल्हा | जळगाव शहर | महावितरण म्हणजे ‘बोलबच्चन’, ६ दिवसाच्या अखंडित वीज पुरवठ्यानंतर पुन्हा बत्ती गुल्ल

महावितरण म्हणजे ‘बोलबच्चन’, ६ दिवसाच्या अखंडित वीज पुरवठ्यानंतर पुन्हा बत्ती गुल्ल

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २१ एप्रिल २०२२ । राज्यात अखंडित वीजपुरवठा केला हि महावितरणची घोषणा फक्त ‘बोलबच्चन’ ठरली आहे. कारण पुन्हा संपूर्ण जिल्हात भारनियमाला सुरुवात झाली आहे.

वाढते तापमान व कोळशाच्या तीव्र टंचाईमुळे राज्यातील वीज पुरवठा विस्कळित झाला होता. गेल्या महिनाभरापासून मोठ्या प्रमाणावर संपूर्ण राज्यात विजेचा तुटवडा जाणवत होता. मात्र या संकटातून महाराष्ट्राला महावितरणने बाहेर काढले आहे. अखंडितपणे संपूर्ण महाराष्ट्रात वीज पुरवठा सुरू आहे. असा बाता महावितरणने मारल्या होत्या. मात्र प्रत्यक्षात जळगाव जिल्ह्यात आज पुन्हा भारनियमनाला सुरुवात झाली आहे. रात्री बारा वाजता जळगाव शहरातील विविध परिसरातील लाईट गेल्याने नागरिकांना मनस्तापाला सामोरे जावे लागले होते. तर दुसरीकडे यावल भुसावळ चाळीसगाव पाचोरा या तालुक्यात मध्ये देखील लाईट गेली होती.

महावितरण कंपनी गेल्या महिनाभरापासून संपूर्ण जळगाव जिल्ह्याला भारनियमनाचा त्रास देण्याचे काम करत आहे. वर गेल्या पाच दिवसात लाईट न गेल्याने गवगवा देखील करून घेत आहे. मात्र सहाव्या दिवशी जिल्ह्यात भारनियमनाचे सत्र पुन्हा सुरू झाले आहे.

भुसावळमध्ये भारनियमन
एकीकडे वाढत्या तापमानामुळे नागरिक कमालीचे त्रस्त झाले आहेत. तर दुसरीकडे त्यात अखंडित वीजपुरवठा आणखीच त्रास दायक ठरत आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी अखंडित लोडशेडींग सुरळीत झाली असता त्यात आता पुन्हा लोडशेडींग सुरू झाली आहे. भुसावळ शहरातील रामदेव बाबा नगरमध्ये अघोषित लोडशेडींग सुरू झाल्याने नागरिकांमध्ये रोष व्यक्त केला जात आहे.

author avatar
टीम जळगाव लाईव्ह