ग्रॅज्युएट्स पाससाठी महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेत बंपर जागा रिक्त ; पगार 49,000 पर्यंत
जळगाव लाईव्ह न्यूज । नोकरी संदर्भ । सरकारी नोकरीच्या शोधात आलेल्या ग्रॅज्युएट्स पाससाठी मोठी संधी चालून आलीय. महाराष्ट्र राज्य सहकारी बँक लिमिटेड (MSC Bank Bharti 2023) मार्फत विविध पदांसाठी भरती निघाली आहे. यासाठीची अधिसूचना संबंधित संकेतस्थळावर प्रसिद्ध झाली आहे. त्यानुसार पात्र उमेदवारांना www.mscbank.com या वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 ऑक्टोबर 2023 आहे. MSC Bank Recruitment 2023
पदाचे नाव व आवश्यक पात्रता :
1) प्रशिक्षणार्थी कनिष्ठ अधिकारी 45
शैक्षणिक पात्रता : (i) 60% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी (ii) 02 वर्षे अनुभव.
2) प्रशिक्षणार्थी लिपिक 107
शैक्षणिक पात्रता : 60% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी.
3) लघुलेखक (मराठी) 01
शैक्षणिक पात्रता : पदवीधर
किती पगार मिळेल?
प्रशिक्षणार्थी कनिष्ठ अधिकारी: प्रशिक्षण कालावधीत प्रति महिना रु.30,000/- स्टायपेंड. प्रशिक्षण कालावधी यशस्वीरित्या पूर्ण केल्यानंतर, प्रशिक्षणार्थी कनिष्ठ अधिकाऱ्याला बँकेच्या नियमित श्रेणीमध्ये स्थान दिले जाईल आणि त्यांना दरमहा सुमारे रु.49,000/- इतके वेतन दिले जाईल.
प्रशिक्षणार्थी लिपिक: प्रशिक्षण कालावधीत दरमहा रु.25,000/- स्टायपेंड. प्रशिक्षण कालावधी यशस्वीरित्या पूर्ण केल्यानंतर, प्रशिक्षणार्थी लिपिक बँकेच्या नियमित श्रेणीमध्ये ठेवला जाईल आणि त्याला दरमहा सुमारे रु. 32,000/- इतके वेतन दिले जाईल.
लघुलेखक (मराठी) : वेतनमान 615-30/5-765-35/1-800-45/ 3-935-65/2-1065 या वेतनश्रेणीत मासिक वेतन रु.50,415/- -235/5-2240-320/4-3520-415/5-5595-525/2-6645-625/3-8520-675/3-10545.
वयाची अट: अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 31 ऑगस्ट 2023 रोजी 21 ते 32 वर्षे असावे
अर्ज शुल्क : पदांनुसार अर्ज शुल्क वेगवेगळे आहे. जाहिरात पाहावी
अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाईन.
निवड प्रक्रिया: ऑनलाइन (लिखित) चाचणी / परीक्षा आणि वैयक्तिक मुलाखत / कौशल्य चाचणी.
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 30 ऑक्टोबर 2023.
अधिकृत संकेतस्थळ : www.mscbank.com