जळगाव लाईव्ह न्यूज | ३० सप्टेंबर २०२३ | जळगाव पोलिसांची धडाकेबाज कामगिरी सुरूच असून एकाच दिवशी तिघांना एमपीडीए अंतर्गत स्थानबद्ध करण्यात आले आहे. जळगाव जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या आदेशानंतर ही कारवाई करण्यात आली. तिघे रामानंद नगर पोलीस ठाणे हद्दीतील रहिवासी असून सचिन अभयसिंग चव्हाण, नितेश उर्फ गोल्या मिलींद जाधव, राहुल नवल काकडे अशी तिघांची नावे आहेत.
याबाबत सविस्तर असे कि, रामानंद नगर पो.स्टे. हद्दीतील अट्टल गुन्हेगार सचिन चव्हाण याच्यावर दरोडा टाकणे, मारामारी, गंभीर स्वरुपाची दुखापत करणे, खंडणी मागणे, खुनाचा प्रयत्न करणे असे विविध प्रकारचे 7 गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहे. तसेच पिंप्राळा परीसरातील तसेच बुधवारच्या बाजारात दुकान लावनारे सामान्य लोकांकडुन प्रत्येकी 20/- रुपये प्रमाणे हप्ता वसुली करीत होता. जर कोणी त्यास हप्त्याचे 20 /- रुपये देण्यास नकार दिला तर त्यांना मारहान करून सामानाचे नुकसान करीत होता. दरम्यान, त्याच्यावर CRPC 110 प्रमाणे प्रतिबंधक कारवाई करुन देखील त्याच्या वर्तनात कोणताही प्रकारचा बदल झालेला नाही. त्यामुळे त्याला स्थानबद्ध करण्यात आले.
दुसरीकडे रामानंद नगर पो.स्टे. हद्दीतील अट्टल गुन्हेगार नितेश ऊर्फ गोल्या मिलींद जाधव याच्यावर रामानंद नगर पोलीस स्टेशनला तसेच इतर पोलीस स्टेशनला अनुक्रमे याचे वर 13 गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल असून याच्यावर प्रतिबंधक कारवाई करुन देखील त्याच्या वर्तनात कोणताही प्रकारचा बदल झालेला नाही. तो पिंप्राळा परीसरातील दुकानदार पानटपरी चालक यांना मारुन टाकण्याची धमकी देऊन त्यांच्या मनात त्याचेबाबत दहशत निर्माण करुन त्यांचे कडुन पैसे न देता सामान घेत होता.
तिसरा गुन्हेगार राहुल नवल काकडे याच्यावर देखील रामानंद नगर पोलीस स्टेशनला तसेच इतर पोलीस स्टेशनला अनुक्रमे याचे वर 13 रात्रीची घरफोडी करणे, चोरी करणे, हद्दपार आदेशाचे उल्लंघन करणे, शस्त्र अधिनियमाचे उल्लंघन करणे असे गुन्हे दाखल आहे. त्याच्यावर 02 वेळा प्रतिबंधक कारवाई करुन तसेच मुंबई पोलीस कायदा कलम 56 (1) प्रमाणे हद्दपार करून देखील त्याच्या वर्तनात कोणताही प्रकारचा बदल झालेला नाही. तो नेहमी त्याचे कब्जात तलवार, चाकु, कोयता असे जिव घेणे हत्यार बाळगुन समता नगर परिसरातील नागरीकांना हत्यारांचा धाक दाखवुन सांगत असे की, मी या गल्लीचा दादा आहे. माझ्या नांदी लागाल तर, तुम्हाला जिवे ठार मारुन टाकेल अशा धमक्या देऊन त्याची दहशत निर्माण करीत होता.
दरम्यान, या तिन्ही गुन्हेगारांवर एम.पी.डी.ए. कायद्यांतर्गत कारवाईसाठी प्रस्ताव पाठविण्यात आला होता. त्याला जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी मंजुरी दिली असून त्यांनतर या तिघांना मध्यवर्ती कारागृह येरवडा पुणे व मध्यवर्ती कारागृह ठाणे येथे स्थानबद्ध करण्यात आले आहे.
ही कार्यवाही करताना प्रामुख्याने पोलीस निरीक्षक शिल्पा पाटील, पो.हे.कॉ. संजय सपकाळे, पो.हे.कॉ. सुशील चौधरी, पो.हे.कॉ. सुनील दामोदरे (स्थानिक गुन्हे शाखा जळगाव) पो.ना. राजेश चव्हाण, पो.हे.कॉ. विजय खैरे, पोना / हेमंत कळसकर पो.ना. रेवानंद साळुंखे, पोना / विनोद सुर्यवंशी पो. कॉ रवींद्र चौधरी, पो.कॉ.जुलालसिंग परदेशी, पोकों/ इरफान मलिक व स्थानिक गुन्हे शाखा पो. कॉ. ईश्वर पाटील या सर्वांनी स्थानबद्ध करण्यात आलेल्या गुन्हेगारांविरुद्ध दाखल गुन्ह्यांच्या कागदपत्रांची पुर्तता करून घेऊन तिघांना स्थान महत्वाची भुमिका पार पाडली आहे