⁠ 
शनिवार, मे 18, 2024

जळगावातील आणखी एक गंभीर गुन्हेगार स्थानबद्ध ; एसपींनी काढले आदेश

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २८ ऑक्टोबर २०२३ । सणासुदीच्या पार्श्वभूमीवर जळगावातील आणखी एका गंभीर गुन्हेगाराला एमपीडीए कारवाई अंतर्गत स्थानबद्ध करण्याचे आदेश जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राजकुमार यांनी दिले. मयूर उर्फ विकी दिलीप आलोणे (वय-३१) असे गुन्हेगाराचे नाव असून त्याची कोल्हापूर येथील मध्यवर्ती कारागृहात रवानगी करण्यात आली.

मयूर उर्फ विकी दिलीप आलोणे यांच्यावर विविध पोलीस स्थानकात वेगवेगळ्या गंभीर स्वरूपाचे ६ गुन्हे दाखल आहेत. यात खूनाचा प्रयत्न, दरोड्या प्रयत्न, जीवेठार मारण्याची धमकी, नागरीकांमध्ये दहशत निर्माण करणे, जुगार खेळणे असे वेगवेगळे स्वरूपाचे गंभीर गुन्ह्यांचा समावेश आहे. त्याच्यावर यापूर्वी देखील प्रतिबंधात्मक कारवाई करून देखील कोणतीही बदल झालेला दिसला नाही.

या अनुषंगाने रामानंदनगर पोलीस ठाण्याच्या पोलिस निरीक्षक शिल्पा पाटील यांनी एमपीडीए करण्याच्या कारवाईसाठी प्रस्ताव तयार केला. हा प्रस्ताव त्यांनी जिल्हा पोलिस अधीक्षक एम. राजकुमार यांना पाठविला. दरम्यान जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राजकुमार यांनी अहवालाचे अवलोकन करत एमपीडीए अंतर्गत कारवाई करण्या मंजूरी दिली आहे. त्याला अटक करून कोल्हापूर येथील मध्यवर्ती कारागृहात स्थानबद्ध करण्यात आले.