खासदार रक्षा खडसे यांनी रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्याकडे केली हि मागणी
जळगाव लाईव्ह न्यूज । २७ जुलै २०२२ । मध्य रेल्वे अंतर्गत भुसावळ विभागातील रावेर लोकसभा क्षेत्र अंतर्गत असलेल्या नांदुरा, मलकापुर, बोदवड, रावेर, निंभोरा व भुसावळ (टेक्निकल हाल्ट) ई. रेल्वे स्टेशन वर सदर स्टेशन वरून जाणाऱ्या प्रवासी रेल्वे गाड्यांना थांबा देण्यात यावा, याबाबत खासदार रक्षा खडसे यांनी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे पाटील यांची दिल्ली येथील रेल्वे मंत्रालयात भेट घेऊन त्यांना निवेदनाद्वारे मागणी केली.
कोविड-१९ महामारी मुळे काही महिने रेल्वे सेवा बंद करण्यात आलेली होती, त्यानंतर कोविडचे प्रमाण कमी झाल्यावर काही रेल्वे गाड्या सुरु करण्यात आल्या परंतु त्यांना भुसावळ विभागातील भुसावळ रेल्वे स्टेशन वगळता कोणत्याही स्टेशनवर थांबा देण्यात आला नाही. तरी प्रवाशांच्या मागणी प्रमाणे सदर रेल्वे गाड्यांना थांबा देण्यात यावा अशी मागणी खासदार श्रीमती रक्षाताई खडसे यांनी यावेळी रेल्वे राज्यमंत्री यांच्या कडे केली.
हे देखील वाचा :
मलकापुर स्टेशन येथे पुणे-अमरावती-पुणे (२२११७/२२११८), नांदुरा स्टेशन येथे जयपूर-हैद्राबाद (१२७१९/१२७२०), प्रेरणा एक्सप्रेस (२२१३७/२२१३८), पुणे-नागपुर-पुणे गरीबरथ (१२११३/१२११४), रावेर स्टेशन येथे महानगरी एक्सप्रेस (२२१७७/२२१७८), निंभोरा स्टेशन येथे राजधानी एक्सप्रेस (११०५७/११०५८), बोदवड स्टेशन येथे नवजीवन एक्सप्रेस (१२६५५/१२६५६), सुरत-अमरावती-सुरत (२०९२५,२०९२६), आझाद हिंद एक्सप्रेस ((१२१२९/१२१३०) तर भुसावळ स्टेशन येथे राजधानी एक्सप्रेस (११०५७/११०५८) (टेक्निकल हाल्ट) ई. प्रवासी रेल्वे गाड्यांना थांबा देण्यात यावा अशी मागणी खासदार श्रीमती रक्षाताई खडसे यांनी यावेळी रेल्वे राज्यमंत्री यांच्या कडे केली.