जळगाव लाईव्ह न्यूज । ८ जानेवारी २०२२ । चोपडा तालुक्यातील धानोरा येथे खा. रक्षाताई खडसे यांनी भेट दिली. यावेळी परिसरातील शेतकऱ्यांची खरीप हंगाम, पीएम किसान सन्मान योजना, केळी पिक विमा या शेती विषयक बाबींवर चर्चा केली. तसेच भाजपा पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, कार्यकर्ते व गावकऱ्यांशी चर्चा करून विविध विषयांवर चर्चा करून मार्गदर्शन केले, व स्थानिक समस्या जाणून घेतल्या.
यावेळी खासदार रक्षाताई खडसे यांच्यासह माजी जि.प.सदस्य शांताराम पाटील, चोपडा तालुकाध्यक्ष पंकज पाटिल, चोपडा शहराध्यक्ष गजेंद्र जैसवाल, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष राकेश पाटिल, भाजयुमो शहराध्यक्ष प्रकाश पाटिल, तालुका सरचिटणीस हनुमंतराव महाजन, किशोर सोनवणे, माजी जिल्हा कार्यकारणी सदस्य जीतू महाजन, चोपडा तालुका उपाध्यक्ष जितेन्द्र पाटिल, सभापती कल्पना पाटिल, शक्तीकेंदृ प्रमुख .रवी टेलर, स्वप्निल पाटिल, प्रकाश महाजन, दिनेश पाटिल, अनिल महाजन यांच्यासह कार्यकर्ते, शेतकरी परिसरातील नागरिक उपस्थित होते.
हे देखील वाचा :
- आज धनत्रयोदशी! जाणून घ्या पूजाविधी आणि शुभ मुहुर्त..
- उत्तर महाराष्ट्रातून लोकमत खान्देश पॉलिटिकल आयकॉन पुरस्काराने अमोल शिंदे सन्मानित
- जळगावच्या ज्येष्ठ नागरिकांना आता कोल्हापूरच्या महालक्ष्मीचे दर्शन घेण्याची संधी, ६ ऑक्टोबरपर्यंत करा अर्ज
- दहाव्या अजिंठा वेरूळ आंतराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या मानद अध्यक्षपदी प्रसिध्द दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर यांची नियुक्ती
- ना.गुलाबराव पाटील यांच्या पुढाकाराने 3 हजार वारकऱ्यांना पंढरपूर वारी