⁠ 
शुक्रवार, जानेवारी 3, 2025
Home | जळगाव जिल्हा | अमळनेर | MP Bus Accident : अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी आ. गिरीश महाजन रवाना

MP Bus Accident : अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी आ. गिरीश महाजन रवाना

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १८ जुलै २०२२ । अमळनेर आगाराची बस इंदौरहून परतत असतांना आज सकाळी १० वाजेच्या सुमारास खरगोन आणि धार दरम्यान पुलावरून नर्मदा नदीत कोसळली. जळगाव जिल्हा विभाग नियंत्रक आणि जिल्हधिकारी अभिजीत राऊत यांनी देखील याबाबत आढावा घेतला आहे. अपघातात मरण पावलेल्या प्रवाशांच्या नातेवाईकांना एसटीतर्फे प्रत्येकी दहा लाख रुपये देण्याची कार्यवाही लगेच करावी असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एस.टी.महामंडळाला दिले. दरम्यान, माजी मंत्री आ. गिरीश महाजन यांना देखील अपघाताच्या मदत कार्यासाठी रवाना करण्यात आल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.

अमळनेर डेपोची बस अमळनेर ते इंदूर या मार्गावर बससेवा आहे. अमळनेर डेपोची बस क्रमांक एमएच.४०.एन.९८४८ बस ही इंदूर येथे गेली होती. तेथून परतीच्या प्रवासासाठी बस अमळनेरच्या दिशेने सकाळी ७.३० वाजता निघाली होती. खरगोन आणि धार या दोन जिल्ह्यांच्या सीमेवर असणार्‍या कलघाट गावाजवळ संजय पुलावरून सकाळी १० वाजेच्या सुमारास नर्मदा नदीच्या पात्रात ही बस कोसळली. यात सुमारे ४० प्रवासी असून यातील काही प्रवासी बेपत्ता झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. बसमधील १३ प्रवाशांना आपला जीव गमवावा लागला असून १५ जणांना वाचविण्यात यश आल्याची माहिती आहे.

अपघाताची माहिती मिळताच महाराष्ट्र आणि मध्यप्रदेश प्रशासनाने संयुक्तररित्या रेस्न्यू ऑपरेशन सुरू केले आहे. राज्य सरकारने मृतांच्या वारसांना दहा लाख रूपये तर केंद्र सरकारने दोन लक्ष रूपयांची घोषणा केली आहे. दरम्यान, फडणवीस पुढे म्हणाले की, या अपघातात अनेक जण नर्मदा नदीपात्रात वाहून गेले असल्याची शक्यता आहे. त्यांना शोधण्याचे काम अजून देखील सुरूच आहे. या संदर्भात जळगाव आणि खरगोन जिल्हाधिकार्‍यांनी मदत कक्ष सुरू केले आहेत. तर या मदत कार्यात सहभागी होण्यासाठी माजी मंत्री आ. गिरीश महाजन यांना तात्काळ तेथे पाठविण्यात आले असल्याची माहिती देखील देवेंद्र फडणवीस यांनी याप्रसंगी दिली आहे.

author avatar
टीम जळगाव लाईव्ह