⁠ 
शुक्रवार, नोव्हेंबर 22, 2024
Home | गुन्हे | MP Bus Accident : १३ मृतदेह नदीतून बाहेर काढले, १० मृतदेहांची पटली ओळख, जळगावच्या चौघांचा समावेश

MP Bus Accident : १३ मृतदेह नदीतून बाहेर काढले, १० मृतदेहांची पटली ओळख, जळगावच्या चौघांचा समावेश

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १८ जुलै २०२२ । मध्य प्रदेशात नर्मदा नदीमध्ये आज सकाळी एसटी महामंडळाची बस कोसळून झालेल्या अपघातात १३ मृतदेह नदीतून काढण्यात आले असून यामध्ये ८ पुरूष, ४ स्त्रिया व एका बालकाचा समावेश आहे. तर जळगावच्या चौघांचा समावेश आहे. दरम्यान, या बसमध्ये सुमारे ४० प्रवासी असल्याची माहिती आहे. परतीच्या प्रवासात बस इंदौरहून पुणे जाण्यासाठी निघाल्यानंतर हा अपघात झाला आहे.

अमळनेर डेपोची बस अमळनेर ते इंदूर या मार्गावर बससेवा आहे. अमळनेर डेपोची बस क्रमांक एमएच.४०.एन.९८४८ बस ही इंदूर येथे गेली होती. तेथून परतीच्या प्रवासासाठी बस अमळनेरच्या दिशेने सकाळी ७.३० वाजता निघाली होती. खरगोन आणि धार या दोन जिल्ह्यांच्या सीमेवर असणार्‍या कलघाट गावाजवळ संजय पुलावरून सकाळी १० वाजेच्या सुमारास नर्मदा नदीच्या पात्रात ही बस कोसळली. यात सुमारे ४० प्रवासी असल्याचे प्राथमिक माहिती आहे. आत्तापर्यंत १३ मृतदेह नदीतून काढण्यात आले असून यामध्ये ८ पुरूष, ४ स्त्रिया व एका बालकाचा समावेश आहे.

बसमधील मृत प्रवाशी
बस वाहक प्रकाश श्रवण चौधरी (वय 40, रा. शारदा कॉलनी अमळनेर), चालक– चंद्रकांत पिता एकनाथ पाटील (वय ४५, अमळनेर), चेतन राम गोपाल (जांगिड़, नांगल कला गोविंदगढ़ जयपुर राजस्थान), जगन्नाथ हेमराज जोशी (वय 70, रा. मल्हारगढ़ उदयपुर राजस्थान), निंबाजी आनंदा पाटील (वय 60, पिळोदा अमळनेर), कमलाबाई नीबाजी पाटिल (वय 55, पिळोदा अमळनेर) या मृतांची ओळख आधारकार्डमुळे पटली आहे. तसेच अरवा मुर्तजा बोरा (वय २७, रा. मूर्तिजापुर, अकोला), सैफुद्दीन अब्बास निवासी (नूरानीनगर, इंदौर) यांची ओळख नातेवाईकांमुळे पटली आहे.

author avatar
टीम जळगाव लाईव्ह