---Advertisement---
धरणगाव

पाळधीत निलेश राणेंच्या विरोधात उद्रेक !

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । ११ नोव्हेंबर २०२१ । पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या कव्वाली गायनावर अतिशय खालच्या स्तरावरून टीका करत भाजप नेते निलेश राणे यांनी कव्वालीसह पालकमंत्र्यांचा अपमान केल्याबद्दल येथील मुस्लीम समुदायातून अतिशय तीव्र प्रतिक्रिया उमटली आहे. आज पाळधी शहरातून मोर्चा काढून राणेंच्या प्रतिमेला चपला – जोड्यांचा मार देऊन त्यांचा निषेध करण्यात आला. याप्रसंगी जोरदार घोषणबाजीने परिसर दणाणून निघाला होता.

paladhi

भाजप नेते निलेश राणे यांनी राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्यावर अलीकडेच अतिशय खालच्या स्तरावरून टीका केली होती. ना. गुलाबरावजी पाटील यांनी पाळधी येथील कार्यक्रमात कव्वाली गायन केल्यामुळे ही टीका करण्यात आली होती. याचा ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात निषेध करण्यात येत आहे. याचीच तीव्र प्रतिक्रिया पाळधी येथे देखील उमटली.

---Advertisement---

पाळधी येथे माजी पंचायत समिती सभापती व चळवळीचे कार्यकर्ते मुकुंदराव नन्नवरे यांच्या नेतृत्वाखाली मुस्लीम समुदायाय सह सर्वधर्मिय हजारो नागरिकांनी स्वयंस्फुर्तीने मोर्चा काढून निलेश राणेंच्या विरोधात घोषणाबाजी केली. ग्रामपंचायत कार्यालयापासून शहरातून मोर्चा काढण्यात आला. यानंतर राणेंच्या प्रतिमेला चपला-जोड्यांचा प्रसाद देऊन त्यांना निषेध करण्यात आला.

याप्रसंगी या निषेध आंदोलनात सहभागी झालेल्यांनी निलेश राणे यांच्यावर टीका केली. ना. गुलाबराव पाटील हे सर्वसमावेशक व्यक्तीमत्व असून त्यांनी मुस्लीम समुदायाबाबत नेहमी न्यायाची भूमिका घेतली आहे. तर कव्वाली हे मुस्लीम धर्मियांसाठी पवित्र मानली जात असून अनेक महत्वाच्या प्रसंगांमध्ये कव्वालीचे गायन करण्यात येते. मात्र निलेश राणे यांच्या मनात मुस्लीम समुदाय आणि ना. गुलाबरावजी पाटील यांच्याबाबत मळमळ असल्यामुळे त्यांनी घृणास्पद टीका केली असल्याचा आरोप याप्रसंगी आंदोलकांनी दिला. राणेंनी आपल्या जीभला आवर घातला नाही तर मुस्लीम समुदाय अजून तीव्र आंदोलन करेल असा इशारा देखील याप्रसंगी देण्यात आला.

या निषेध आंदोलनात माजी पंचायत समिती सभापती मुकुंदराव नन्नवरे, विधानसभा क्षेत्र प्रमुख संजय पाटील , सरपंच प्रकाश पाटील,  माजी सरपंच हाजी सुलतान पठाण, हाजी फिरोज खान,  हाजी यासीन पठाण, दानिश, माजी सरपंच अरुण पाटील, युवा सेनेचे तालुकाप्रमुख पिंटू कोळी, नारायण आप्पा सोनवणे, उद्योगपती दिलीपबापू पाटील, पाळधी खुर्दचे सरपंच शरद कोळी, प्रशांत झंवर, माजी सरपंच अलीमभैया देशमुख, पप्पू शिंदे, धर्मेंद्र कुंभार, माजी सरपंच सोपान पाटील, किरण पाटील,सुरेश पाटील, बंडू नारखेडे, विभाग प्रमुख गोकुळ लंके, गोकूळ नाना पाटील, माजी सरपंच अलीम देशमुख, आत्मा तालुका अध्यक्ष सुधाकर पाटील, संगोयोचे  सदस्य संजय माळी, फुलपाट सरपंच हरिभाऊ पाटील, तुषार मोरे, सुनील भोई, सचिन माळी, सचिन माळी, शेख कालू, शेख शाकिर आदींसह अन्य मान्यवर यांच्यासह हजारो नागरिक सहभागी झाले होते.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---