जळगाव जिल्हा

नवीन बसस्थानक समोरील सुलभ शौचालय स्थलांतरीत करा : राष्ट्रवादी अर्बन सेल

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २२ ऑगस्ट २०२१ । जळगाव शहरातील जुने बस स्थानकासमोरील रस्त्यावर सुप्रीम कंपनीच्या सहकार्यातून नियोजित अत्याधुनिक सुलभ शौच्यालय निर्माण केले जाणार आहे. हे शौचालय क्रीडा संकुलाजवळ पोलीस मल्टीपर्पज हॉलबाहेर स्थलांतरित करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस अर्बन सेलच्या जिल्हाध्यक्षा डॉ.अश्विनी विनोद देशमुख यांच्यासह इतर पदाधिकाऱ्यांनी केली आहे. यासंदर्भातील निवेदन त्यांनी उपमुख्यमंत्री ना.अजित पवार यांना पाठविले आहे.

राष्ट्रवादी अर्बन सेलतर्फे देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, अत्याधुनिक शौच्यालयाच्या बांधकामाला प्रथम दर्शनी कोणाचा विरोध नाही. परंतु ज्या ठिकाणी सुप्रीम कंपनीच्या सहकार्यातून अत्याधुनिक शौचालयचे बांधकाम नियोजित आहे. त्या जागेवर बांधकाम होवू नये ही जनभावना आहे.

अत्याधुनिक शौचालयाचे बांधकामासाठी निश्चित करण्यात आलेल्या नवीन बसस्थानकासमोरील जागेजवळ नागरिकांचे श्रद्धास्थान असलेले “चिमुकले राम मंदिर आहे”. तसेच या नियोजित शौचालयाचे OUTLET (exhaust ) ज्या दिशेला असणार आहे. त्या जागेवर “ शहीद सैनिक स्मारक ” आहे यामुळे सैनिक / माजी सैनिकांनाही ही जागा अयोग्य वाटत असून त्यांचाही या जागेला विरोध असून याकडे तातडीने लक्ष देणे आवश्यक आहे.

नागरिकांचे श्रद्धास्थान असणारे नवीन बसस्थानक समोरील चिमुकले राममंदिर येथे असंख्य भाविक दर्शनासाठी येत असतात. तसेच या लगत असलेल्या शहीद सैंनिकांच्या स्मारकामुळे एक प्रेरणास्थान म्हणून नागरिकांच्या मनात श्रद्धा व आस्था असणार्‍या जागेजवळ,परिसरात अत्याधुनिक शौचायालयाचे बांधकाम करण्याचा प्रयत्न झाल्यास लोकांच्या धार्मिक व ऐतिहासिक महत्व असणार्‍या मानवी भावना दुखावल्या जाणार असून यामुळे मोठा वाद निर्माण होण्याची भीती असून तसे झाल्यास प्रशासनावरचा ताण वाढून कायदा व सुव्यवस्थेला गालबोट लागण्याची संभावना आहे. हे सर्व लक्षात घेऊन जनभावनेचा सन्मान करत सदर नियोजित असलेल्या हॉटेल तिरूपती समोर  ‘पोलिस मल्टीपर्पज हॉलजवळ’ हलविणे योग्य राहील.

पोलिस मल्टीपर्पज हॉलजवळ असलेला रस्ता हा रुंद असल्याने या ठिकाणी अत्याधुनिक शौचालयाचे बांधकाम झाल्यास ते नागरिकांना जास्त सोयीचे व उपयोगाचे ठरणार आहे, पोलिस मल्टीपर्पज हॉलजवळ जिल्हा क्रीड संकुल आहे. तसेच काही थोड्याच फुट अंतरावर बस स्थानक आहे. यामुळे नागरिकांसह प्रवाशी व खेळाडू यांची खर्‍या अर्थाने सोय होणार आहे. या शिवाय वेळोवेळी पोलिस भरती ,सैन्य भरती साठी  पोलिस मल्टीपर्पज हॉलमागील मैदनावर येणार्‍या तरुण-तरुणींसाठीसाठी सुध्दा ते अत्याधुनिक शौचालय सोईचे ठरेल. तसेच पोलिस मल्टीपर्पज हॉल मध्ये नेहमी लग्न समारोह विविध कार्यक्रमाचे आयोजन होत असते. अर्थात पोलिस मल्टीपर्पज हॉलजवळ नियोजित अत्याधुनिक शौचालय बांधल्यास ते उपयुक्त व नागरिकांच्या जास्त सोईचे होईल.

विशेष म्हणजे नवीन बसस्थानकात आधीच एक मोठ्या स्वरूपाचे शौचालय  असून सादर शौचालयाची थोड्या फार प्रमाणात डागडुजी, दुरूस्ती केल्यास ते प्रवाशांना फायदेशीरच असल्याने नवीन बस स्थानकासमोर चिमुकले राम मंदिर व शहीद सैंनिकांच्या स्मारकालगत शौचालायचे बांधकाम संयुक्तिक नाही. हे सर्व लक्षात घेऊन सुप्रीम कंपनीच्या सहकार्यातून बांधण्यात येणारे अत्याधुनिक शौचालय हे

थोड्याच अंतरावर असलेल्या पोलिस मल्टीपर्पज हॉलजवळ निर्माण करण्याचे आदेश द्यावेत ही विनंती यासाठी अर्बन सेल राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी जळगाव आवश्यक ते सहकार्य देण्यास तयार राहील.

विशेष विनंती : –  जनभवना दुर्लक्षित करून सुप्रीम कंपनीच्या सहकार्यातून बांधण्यात येणार्‍या नियोजीत अत्याधुनिक शौचालयाची जागा पोलिस मल्टीपर्पज हॉलजवळ स्थलांतरित न केल्यास नाईलाजाने आम्हाला जन आंदोलन छेडावे लागेल याची नोंद घ्यावी.

आपण संमती दिल्यास नविन बस स्थानका मधील शौचालय दुरूस्ती व दैनंदिन साफसफाईची जबाबदारी अर्बन सेल, राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी, जळगाव घेण्यास तयार आहे.

निवेदनावर जिल्हाध्यक्षा डॉ.अश्विनी देशमुख, कार्याध्यक्ष मनोज वाणी, समन्वयक मुविकोराज कोल्हे, जयश्री बऱ्हाटे, तनुजा भिरुड, लीना पाटील, ममता पाटील, मानसी पाटील, वर्षा पाटील, मिलिंद सोनवणे, जुबेर खाटीक, प्रवीण महाजन, यशवंत पाटील, राकेश पाटील, अजय सोनवणे, कृष्णा पाटील, रईस खाटीक, दीपक सोनार आदींच्या सह्या आहेत.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button