जळगाव लाईव्ह न्यूज । चोपडा तालुक्यातून एक खळबळजनक घटना समोर आलीय. ज्यात उमर्टी (ता चोपडा) येथील २८ वर्षीय महिलेने दोन मुलांसह विहिरीत उडी घेऊन आत्म@# हत्या केली. पमिता डोंगरसिंग पावरा (२८), अडीच वर्षांचा विरेन आणि १५ दिवसांचे बाळ अशा तिघांचा मृतांमध्ये समावेश आहे. या घटनेनं परिसरात एकच खळबळ उडाली असून या महिलेने टोकाचे पाऊल का उचलले हे अद्याप स्पष्ट झाले नाही.

चोपडा तालुक्यातील उमर्टी हे गाव आहे. पमिता या दोघा मुलांसह कालपासून बेपत्ता होत्या. बुधवारी स्वतःच्याच विहिरीत त्या तिघांचे मृतदेह तरंगताना दिसून आले. चोपडा उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन केल्यानंतर रात्री तिघांवर अंत्यसंस्कार करण्यात आले. ही महिला काही दिवसांपूर्वीच बाळंतीण झाली.

त्यामुळे ती माहेरी आली होती. त्या काळात मोठा मुलगा विरेन हा त्याच्या वडिलांकडे होता. दोन-तीन दिवसांपूर्वीच ही महिला आपल्या पतीसोबत सासरी आली होती. या महिलेने टोकाचे पाऊल का उचलले हे अद्याप स्पष्ट झाले नसले तरी पोलिसांकडून याचा शोध घेतला जातो आहे. दरम्यान, या घटनेची










