जळगाव लाईव्ह न्यूज । ४ सप्टेंबर २०२१ । राज्यावर कोरोना व नैसर्गिक संकट असतांना दिड वर्षापासून घरात बसून असलेले उद्वव ठाकरे कसेल लोकप्रिय मुख्यमंत्री, त्यांच्या काळात मंत्रालयात ४० हजार फाईल पेंडींग असून ते मंत्रालयात फिरकत नाही, असे म्हणत माजी मंत्री आ.गिरीष महाजन यांनी राज्य सरकारवर भाजपाच्या मेळाव्यात जोरदार टिका केली.
आ.महाजन म्हणाले की, मुख्यमंत्र्यांकडे फक्त एकच काम आहे. पाऊस येत नाही त्याला केंद्र सरकार जबाबदार, प्रत्येक वेळी केंद्रावर खापर फोडून राज्यात कोणतेही काम करायचे नाही. केवळ घोषणा करणारे हे राज्य सरकार आहे. नैसर्गिक आपत्ती आली असली शेतकऱ्यांना दिलासा देत नाही. महाआघाडी सरकार शेतकरी विरोधी आहे, अशी टीका आ.महाजन यांनी केली.
ओंकारेश्वर (रावेर) येथे भारतीय जनता पार्टीचा समर्थ बूथ अभियान अंतर्गत शक्ती केंद्र प्रमुख बूथ प्रमुख कार्यकर्ता मेळावा घेण्यात आला. यावेळी कार्यकर्त्याना संबोधीत करतांना माजी मंत्री आ.गिरीष महाजन यांनी टिका केली.
यांची होती प्रमुख उपस्थित
बैठकीला खासदार रक्षा खडसे, भाजपा जिल्हाध्यक्ष आ.राजूमामा भोळे, जिल्हा परिषद अध्यक्ष रंजना पाटील, जिल्हा परिषद सदस्य नंदकिशोर महाजन, कैलास सरोदे, नंदा पाटील, माजी शिक्षण सभापती सुरेश धनके, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष पद्माकर महाजन, प्रल्हाद पाटील, अजय भोळे, पंचायत समिती सभापती कविता कोळी, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष श्रीकांत महाजन, उपसभापती धनश्री सावळे, पंचायत समिती सदस्य योगिता वानखेडे, भाजपा तालुकाध्यक्ष राजन लासुरकर, भाजपा सरचिटणीस महेश चौधरी, माजी उपसभापती सुनिल पाटील, अमोल पाटील, शहराध्यक्ष दिलीप पाटील, उमेश महाजन, शिवाजीराव पाटील, हरलाल कोळी, सरपंच महेंद्र पाटील आदीसह भाजपा पदाधिकारी मोठ्या संखेने उपस्थिती होते.
भाजपाच्या बैठकीला झेरॉक्स कॉपी चालणार नाही
निवडणूक तोंडावर असतांना भाजपाच्या कार्यकर्ते मेळाव्यात काही महिला लोकप्रतिनिधी दांड्या मारल्या यावर भाजपाकडून जिल्हा उपाध्यक्ष अजय भोळे यांनी किती पंचायत समिती सदस्य उपस्थित याबाबत आढावा घेत होते. मेळाव्यात महिला पंचायत समिती सदस्या गैरहजेरीत पतीने हातवर केला. यावर नाराज होऊन बैठकीला लोकप्रतिनिधींना आणावे झेरॉक्स कॉपी चालणार नसल्याचे अजय भोळे यांनी सुनावले.