⁠ 
शनिवार, एप्रिल 20, 2024

Monsoon News : दमदार पावसाची प्रतीक्षा कायम ! आता हवामान खात्याने व्यक्त केला ‘हा’ अंदाज?

जळगाव लाईव्ह न्यूज । १७ जून २०२२ । राज्यात आगमन झालेल्या (Monsoon) मान्सूनने हळूहळू का होईना राज्य व्यापले आहे. तरी देखील कोकण वगळता राज्यातील अन्य ठिकाणी दमदार पाऊस झाला नसल्याने शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. निम्मा जून महिना संपत आला तरी मान्सूनने कुठेही जोरदार हजेरी लावली नाहीय. जळगावकर देखील चांगल्या पावसाच्या प्रतीक्षेत असून अशात १७ जून ते २० जूनपर्यंत कोकण, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात हलका ते मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे.

आज पहाटपासून जळगाव जिल्ह्यात ढगाळ वातावरण होता. आज सकाळी जिल्ह्यातील काही भागात पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. मात्र दमदार पावसाच्या प्रतीक्षेत जळगावकर आहेत. हवामान विभागाने १३ जून राेजी खान्देशात मान्सून दाखल झाल्याची आनंदाची बातमी दिली हाेती. दरम्यान, काेरड्या मान्सूनने खान्देशवासीयांची साफ निराशा केली. त्यामुळे पाऊस बरसणार कधी असा सवाल उपस्थित होत आहे.

यादरम्यान, आगामी चार दिवसात राज्यात मोसमी पावसाला अनुकूल वातावरण असून राज्यात ठिकठिकाणी हलका ते मुसळधार पावसाचा अंदाज कुलाबा वेधशाळेच्या शास्त्रज्ञ यांनी व्यक्त केला आहे. १७ जून ते २० जूनपर्यंत कोकण, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात हलका ते मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे.

दरम्यान, ज्या ठिकाणी पाऊस झालेला आहे. त्या ठिकाणच्या शेतकऱ्यांनी नेमकी पेरणी कधी करावी असा प्रश्न उपस्थित होत आहे. तर कृषी विद्यापीठ आणि कृषी तज्ज्ञांनाकडून याबाबत सल्ला मिळाला आहे. 100 मिलीमीटर पाऊस पडेपर्यंत शेतकऱ्यांना पेरणीची घाई करु नये असा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे. दुबार पेरणीची अडचण टाळण्यासाठी कृषी तज्ज्ञांनी हा सल्ला दिला आहे.