⁠ 
शुक्रवार, एप्रिल 26, 2024

Monsoon rain | खुशखबर.. यंदा 10 दिवस आधीच मान्सून अंदमानात दाखल होणार, महाराष्ट्रात कधी?


जळगाव लाईव्ह न्यूज । ६ मे २०२२ । गेल्या काही दिवसापासून महाराष्ट्रासह देशात उष्णतेमुळे नागरिक प्रचंड वैतागले आहे. अशा परिस्थितीत लोकांना घरातून बाहेर पडणेही कठीण होत आहे. मात्र लवकरच नागरिकांना उन्हापासून दिलासा मिळणार आहे. कारण यंदा मान्सूनचे (Monsoon rain) लवकर आगमन होणार असल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. २० ते २१ मे रोजी मान्सून अंदमानात दाखल होईल. तर तो भारतात १० दिवस आधीच दाखल होण्याची शक्यता आहे. असा अंदाज युरोपियन सेंटर फॉर मीडियम रेंज वेदर पॉडकास्ट संस्थेने वर्तविण्यात आला आहे.

यंदा मार्च महिन्यापासूनच महाराष्ट्रासह देशात उन्हाचा चटका लागला आहे. राज्यात तापमानाने ४० चा पारा पार केला. त्यानंतर एप्रिल महिन्यात तर उष्णतेच्या लाटेमुळे नागरिक चांगेलच हैराण झाले आहे. मात्र, अशातच शेतकऱ्यांसह नागरिकांना उष्णतेपासून दिलासा मिळणार आहे. यंदा मान्सून दहा दिवस आधीच मान्सून दाखल होणार असल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. साधारण 20 ते 21 मे रोजी मान्सून अंदमानात (Andaman) दाखल होईल. त्यानंतर 28 ते 30 मे पर्यंत मान्सून केरळात (Kerala) दाखल होईल.

गतवर्षी केरळमध्ये 1 जूनला मान्सूनचे आगमन झाले हाेते. मात्र, चक्रीवादळामुळे केरळमधील मान्सूनचे आगमन 3 जूनपर्यंत लांबणीवर पडले होते. त्यामुळे आताही सर्व परिस्थिती सुरळीत राहिल्यासच मान्सून 28 मे पर्यंत केरळमध्ये दाखल होईल. त्यानंतर मान्सून भारताच्या इतर भागांच्या दिशेने वाटचाल करण्यास सुरुवात करेल. असा अंदाज ‘युरोपियन सेंटर फॉर मीडियम रेंज वेदर’ने वर्तवला आहे.

दरम्यान, मान्सूनचा पाऊस तळकोकणात कधी दाखल होणार, याचा अंदाज अद्याप हवामान खात्याने जाहीर केलेला नाही. मात्र, मान्सूनचा आजवरचा साधारण प्रवास लक्षात घेता केरळमध्ये आगमन झाल्यानंतर मान्सून ७ जूनपर्यंत तळकोकणात (Konkan) दाखल होऊ शकतो. त्यानंतर चार दिवसांत म्हणजे ११ जूनपर्यंत मान्सून मुंबईत (Mumbai)दाखल होऊ शकतो.