---Advertisement---
हवामान महाराष्ट्र

मान्सूनचा पहिला पाऊस महाराष्ट्रात कधी पडणार? पेरणी योग्य पाऊस कधी होणार ; पंजाबरावांचा अंदाज वाचा..

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । ८ मे २०२४ । सध्या राज्यात सूर्य आग ओकत आहेत. बहुतांश जिल्ह्यांमध्ये उन्हाचा पारा ४२ अंशापेक्षा जास्त नोंदविला जात असल्याने भयंकर उष्णता जाणवत आहे. या उष्णतेसह उकाड्यात वाढ झाल्याने नागरिक हैराण झाले आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांसह शेतकरी आता मान्सून पावसाची वाट पाहात आहे. यातच मान्सून 2024 संदर्भात हवामान अभ्यासक पंजाबराव डख पाटील एक मोठी माहिती दिली आहे.

monsoon update 2024 jpg webp

खरंतर पंजाबरावांनी महाराष्ट्रात मान्सूनचा पहिला पाऊस कधी हजेरी लावणार, पेरणी योग्य पाऊस कधी होणार, शेतकऱ्यांच्या पेरण्या कधीपर्यंत पूर्ण होणार या संदर्भात सविस्तर अशी माहिती दिली आहे. पंजाब रावांनी दिलेल्या माहितीनुसार यंदा 22 मे ला अंदमानातं मान्सूनचे आगमन होण्याची शक्यता आहे. यंदाचा पावसाळा हा चांगला राहणार असल्याचा दावा त्यांनी केला आहे.

---Advertisement---

पंजाब रावांनी सांगितल्याप्रमाणे यंदा आपल्या महाराष्ट्रात 12 ते 13 जूनच्या आसपास पावसाला सुरुवात होण्याची शक्यता आहे. म्हणजे 12-13 जूनला राज्यात मान्सूनच्या पावसाला सुरुवात होणार आहे. तथापि, महाराष्ट्रात पेरणी योग्य पावसाला 22 जून नंतरच सुरुवात होणार आहे.

22 जून नंतर पेरणी योग्य पावसाला सुरुवात होईल आणि जूनच्या शेवटच्या आठवड्यात राज्यातील शेतकऱ्यांच्या पेरण्या पूर्ण होतील असे भाकीत पंजाबरावांनी यावेळी वर्तवले आहे. एवढेच नाही तर यावर्षी जुलैमध्ये जास्तीच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. परंतु ऑगस्टमध्ये कमी पाऊस पडणार असा अंदाज त्यांनी दिला असून सप्टेंबर आणि ऑक्टोबर या दोन महिन्यात मोठ्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. सप्टेंबर आणि ऑक्टोबर मध्ये जोरदार पावसाची शक्यता असून या कालावधीत राज्यातील जवळपास सर्वच धरणे फुल भरतील असा विश्वास देखील त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे. यामुळे आता पंजाबरावांचा हा मान्सून 2024 चा सुधारित अंदाज कितपत खरा ठरतो हे पाहणे विशेष उत्सुकतेचे राहणार आहे.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---