जळगाव लाईव्ह न्यूज । १८ मार्च २०२२ । शहरातील फुले मार्केटमध्ये असलेल्या कपड्यांच्या दुकानात प्रवेश करीत दुकान मालकाची नजर चुकवून गल्ल्यातून एका तरूणाने पाच हजारांची रोकड लंपास केल्याची घटना आज दुपारी १.४० च्या सुमारास घडली. याप्रकरणी शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.
शहरातील सिंधी कॉलनी परिसरात राहणारे करण श्रावण तलरेजा यांच्या मालकीचे पूजा कलेक्शन नावाने फुले मार्केटमध्ये दुकान आहे. शुक्रवारी नेहमीप्रमाणेच दुकानावर असताना दुपारी १.३० च्या सुमारास एक तरूण कपडे खरेदीच्या बहाण्याने दुकानात आला. करण तलरेजा हे इतर ग्राहकांना कपडे दाखवत असताना त्या तरुणाने गल्ला उघडत त्यातून पाच हजार रुपये रोख काढून पोबारा केला. संपूर्ण घटनाक्रम सीसीटीव्ही कॅमेरा कैद झाला असून याप्रकरणी शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.