पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वामुळे महिलांच्या सन्मानात, सुरक्षिततेमध्ये आणि सक्षमीकरणात गतिमानता – डॉ केतकी पाटील
जळगाव लाईव्ह न्यूज । 6 मार्च 2024 । पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन पंचवार्षिकच्या नेतृत्वामुळे देशातील महिलांच्या सन्मानात, सुरक्षिततेमध्ये आणि सक्षमीकरणात गतिमानता आली. यामुळे महिलांना नवनवीन संधी उपलब्ध झाल्या असून त्यांच्या कुटुंबाची देखील प्रगती झाली. त्यामुळे पुन्हा एकदा मोदी सरकार येण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्नशील राहावे असे आवाहन भारतीय जनता पक्ष महिला मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष डॉ. केतकीताई पाटील यांनी केले.
पश्चिम बंगालमधील बारासात येथून देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी यांनी नारीशक्ती वंदन समापन समारोह निमित्त भाषण केले. त्याचे थेट प्रसारण आज जळगाव शहरात बालगंधर्व नाट्य गृहात एलईडी द्वारे करण्यात आले. यावेळी महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा आणि जळगाव महानगर जिल्हा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यक्रमात उपस्थित राहून पंतप्रधान मोदींचे भाषण श्रवण केले.
याप्रसंगी आदरणीय मोदीजी यांनी सांगितलं की, महिलांची सुरक्षा सुविधा आणि सशक्तिकरण यावर कार्यकाळात भर दिला आहे. यात विविध योजनांचा उल्लेख त्यांनी केला. मोदी का परिवार कसा तयार झाला याबाबत सविस्तर माहिती ही त्यांनी भाषणाद्वारे दिली. मोदी के शरीर का कणकण और जीवन का पल पल देश के मातृभूमी के लिए समर्पित है असा विश्वासही त्यांनी या कार्यक्रमाद्वारे दिला.
यावेळी आमदार राजू मामा भोळे, जिल्हा महानगर अध्यक्ष उज्वलाताई बेंडाळे, महिला मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष डॉक्टर केतकीताई पाटील, प्रदेश सचिव रेखाताई वर्मा, विधानसभा निवडणूक प्रमुख विशाल त्रिपाठी, शहराध्यक्ष भारतीताई सोनवणे, महेश जोशी, राहुल वाघ, ज्योतीताई सोनवणे, मनोज दादा काळे, लताताई बाविस्कर, युवा मोर्चा अध्यक्ष महेश पाटील, राहुल वाघ, ओबीसी मोर्चा अध्यक्ष मिलिंद चौधरी, ऍड शुचिता हाडा, माजी महापौर सीमाताई भोळे यांच्या सह शहरातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.