⁠ 
रविवार, डिसेंबर 22, 2024
Home | जळगाव जिल्हा | जळगाव शहर | Big Breaking : जळगाव पोलिसांचा पुन्हा दणका, ११ गुन्हेगारांच्या गॅंगवर मोक्का

Big Breaking : जळगाव पोलिसांचा पुन्हा दणका, ११ गुन्हेगारांच्या गॅंगवर मोक्का

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २८ जानेवारी २०२३ । जळगाव पोलिसांनी गुन्हेगारांवर कारवाईचा सपाटाच लावला असून एमपीडीएच्या महिनाभरात ४ कारवाया झाल्या आहेत. तीन दिवसापूर्वीच जळगाव शहरातील ५ जणांच्या गँगवर पोलिसांनी मोक्का कायद्यानुसार कारवाई केल्यानंतर आज पुन्हा चाळीसगाव येथील ११ जणांच्या टोळीला पोलिसांनी मोक्का लावला आहे. सर्वांना नाशिक कारागृहात स्थानबद्ध करण्यात येणार आहे.

जळगाव जिल्हा पोलिसांनी गुन्हेगारांना सळो की पळो केले असून सर्वसामान्यांना उपद्रवी ठरणाऱ्यांवर एमपीडीए आणि मोक्कानुसार कारवाई केली जात आहे. नाशिक परिक्षेत्र विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ.बी.जी.शेखर यांनी प्रस्तावाला शुक्रवारी मंजुरी दिली असून ११ जणांवर मोक्का कायद्यानुसार कारवाई करण्यात येणार आहे. मोक्का कायद्यानुसार नाशिक कारागृहात स्थानबद्ध करण्यात येणार आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राज कुमार यांच्या नेतृत्वाखाली जळगाव पोलिसांकडून दमदार कारवाई सुरू असून गुन्हेगारांना धडकी भरली आहे. एकाच आठवड्यात जळगाव पोलिसांनी दोन गॅंगवर मोक्का तर एका गुन्हेगारावर एमपीडीए कायद्यानुसार कारवाई केली आहे.

चाळीसगाव शहर पो.स्टे. गु.र.नं. ४८५ / २०२२ भादंवि क. ३०७,३२४, १४३, १४७, १४८, १४९, १२०(ब) या गुन्हयांतील आरोपी (टोळी प्रमुख) अमोल छगन गायकवाड वय २५ रा. स्वामी समर्थ कॉलनी, नागद रोड, चाळीसगाव ता. चाळीसगाव जि. जळगाव, B) (टोळी सदस्य) २) सुमित ऊर्फ बाबा अशोकराव भोसले रा.नागद रोड, चाळीसगाव ता. चाळीसगाव जि. जळगाव, (अटकपूर्व जामीनावर) ३) कृष्णा छगन गायकवाड रा. नागद रोड, चाळीसगाव ता. चाळीसगाव जि. जळगाव, ४) संतोष ऊर्फ संता पहेलवान रमेश निकुम रा. हिरापुर ता. चाळीसगाव जि. जळगाव, ५) विक्की ऊर्फ शुभम विजय पावले वय २३ रा. हिरापुर ता.चाळीसगाव जि. जळगाव, ६) श्याम ऊर्फ सॅम नामदेव चव्हाण वय २४ रा. हिरापुर ता. चाळीसगाव, ७) सचिन सोमनाथ गायकवाड वय २२ रा.बाबाजी चौक चाळीसगाव ता.चाळीसगाव जि.जळगाव, ८) जयेश दत्तात्रय शिंदे (पाटील) वय २४ रा. भोरस खुर्द ता. चाळीसगाव जि. जळगाव, ९) उद्देश ऊर्फ गुड्डू सुधिर शिंदे वय २४ रा. हिरापुर ता. चाळीसगाव जि. जळगाव, १०) योगेश रतन पांचाळ (पडवळकर) वय २६ रा. हिरापुर ता. चाळीसगाव जि. जळगाव, ११) पुष्पराज ऊर्फ सुनिल जगताप रा. पिंपळरखेड ता. चाळीसगाव जि.जळगाव (फरार) गुन्हा दाखल झालेला आहे. सदर गुन्हयांतील आरोपीतांनी यापुर्वी टोळीने आर्थिक फायदयासाठी बरे गुन्हे केलेले असल्याचे चाळीसगाव शहर पो.स्टे. अभिलेखावर दिसून आले.

त्याप्रमाणे पोलीस अधीक्षक एम. राज कुमार, अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, रमेश चोपडे, सहाय्यक पोलीस अधीक्षक अभयसिंह देशमुख यांनी एलसीबी निरीक्षक किसन नजनपाटील व चाळीसगाव निरीक्षक कांतीलाल पाटील यांना योग्य ते मार्गदर्शन करुन सदर टोळीवर वरील दाखल गुन्हयांत मोक्का कायदयाचे कलम वाढविण्याबाबत प्रस्ताव तयार करण्याबाबत सुचना दिल्या. त्याप्रमाणे अभयसिंह देशमुख यांनी मोक्का प्रस्ताव तयार करुन स्थानिक गुन्हे शाखा, जळगाव यांच्या मार्फत पोलीस अधीक्षक जळगाव कार्यालयात दि.२१ रोजी सादर केला होता.

पोलीस अधीक्षक एम. राज कुमार यांचेकडे प्रस्ताव प्राप्त झालेनंतर त्यांनी प्रस्तावाचे अवलोकन करुन प्रस्ताव विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ.बी.जी.शेखर यांच्याकडे पाठविला होता. महानिरीक्षकांनी प्रस्तावाचे अवलोकन करुन वरील आरोपीतांनी टोळीने केलेल्या गुन्हे अभिलेख तपासणी करुन सदर गुन्हयांत महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम १९९९ चे क.. ३(१)(II), ३(२), ३(४) (मोक्का) हे कलम लावण्याची परवानगी दि.२५ रोजी दिल्याने चाळीसगाव शहर पो.स्टे. वरील गुन्हयांतील वरील आरोपीतांवर मोक्का कायदयाखाली कलम लावण्यात आलेले आहे.

प्रस्ताव कामी वरिष्ठ पोलीस निरीक्षक किसन नजनपाटील व त्यांचे अधिनस्त पोलीस अंमलदार सफौ युनूस शेख इब्राहिम, पोहेकॉ सुनिल पंडीत दामोदरे तसेच चाळीसगाव शहर पो.स्टे निरीक्षक कांतीलाल पाटील, सहा. पो. निरी. विशाल टकले यांनी योगदान दिले आहे.

author avatar
चेतन वाणी
पत्रकारिता क्षेत्रात गत ११ वर्षांपासून कार्यरत. क्राईम रिपोर्टींगचा १० वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, महापालिका, उद्योग जगतातील विशेष लेखन. मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट.