---Advertisement---
जळगाव जिल्हा कोरोना जळगाव शहर प्रशासन

माेहाडी रुग्णालयात आठवडाभरात सज्ज होणार ४०० बेड

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । २ जानेवारी २०२२ । कोरोना रुग्ण संख्यासह ओमायक्रॉनचा धोका वाढत असल्याने प्रशासनातर्फे सर्व जिल्ह्यात यंत्रणा सज्ज ठेवण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत. त्यानुसार जळगाव जिल्ह्यातही तयारी सुरू झाली आहे. मोहाडी येथील शासकीय महिला रुग्णालयात कोविड रुग्णांसाठी व्यवस्था करण्यात आली आहे. या ठिकाणी ४०० बेड ठेवण्यात आले असून, ७५ बेड हे ओटू आहेत तर उर्वरित ३२५ बेडला ओटू बसवण्याच्या कामास शनिवारी सुरुवात झाली. आठवडाभरात याठिकाणी संपूर्ण यंत्रणा सज्ज होईल.

rugn bed jpg webp

जिल्ह्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत मोठ्या प्रमाणावर बाधित आढळून आले होते. रुग्णांना बेड मिळवण्यासाठी रुग्णालयांच्या चकरा माराव्या लागल्या होत्या. ही परिस्थिती लक्षात घेता तिसऱ्या लाटेत बेडचे नियोजन करण्यात आले असून, आता सध्या मोहाडी रुग्णालय हे सज्ज करण्यात आले आहे. ७५ ओटू बेड याठिकाणी सज्ज असून, रुग्ण उपचार घेत आहेत. उर्वरित ३२५ बेडला ओटू जोडण्याचे काम शनिवारपासून सुरू झाले. वाढती रुग्णसंख्या पाहता प्रशासनातर्फे तयारी करण्यात आली असून, ओटूसह ऑक्सिजन टँक बसवण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. मोहाडी रुग्णालयात दोन ऑक्सिजन टँक बसवणार असून, एक ऑक्सिजन जनरेशन प्लँट आहे. हा प्लँट तयार झाला असून, फक्त ट्रान्स्फाॅर्मरचे काम बाकी आहे. ऑक्सिजन लिक्विड टँकचेही काम झाले आहे. ही सर्व कामे आठवडाभरात पूर्ण होणार असून, ४०० बेडचे कोविड रुग्णालय सज्ज होईल. यामुळे काेराेनाची लाट पसरल्यास रुग्णांना तत्काळ उपचारासाठी मदत मिळण्यास लाभ मिळेल.

---Advertisement---

…तर जीएमसी पुन्हा कोविड रुग्णालय : मोहाडी रुग्णालयात कोविड रुग्णांसाठी व्यवस्था करण्यात आली असली तरी डॉक्टर व योग्य उपचार पद्धती असल्याने गंभीर स्वरूपाच्या रुग्णांवर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचार करण्यात येतील असे प्राथमिक नियोजन केले आहे. वेळ पडल्यास जीएमसी पुन्हा कोविड करण्याबाबतही तयारी करण्यात आली आहे. रुग्णसंख्या पाहून याबाबत निर्णय घेण्यात येणार असल्याचे प्रशासनातर्फे सांगण्यात आले.

२० डॉक्टरांसह ३० नर्सेसचा स्टाफ असेल कार्यरत : मोहाडी येथील रुग्णालयात तिसऱ्या लाटेच्या अनुशंगाने तयारी करण्यात आली असून, सध्या याठिकाणी २० डॉक्टर त्याचप्रमाणे ३० नर्सेसचा स्टाफ कार्यरत आहेत. यात जिल्हा रुग्णालय तसेच आयुर्वेदिक महाविद्यालयातील कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

तिसऱ्या लाटेच्या अनुषंगाने प्रशासनाकडून तयारी

तिसऱ्या लाटेच्या अनुषंगाने तयारी करण्यात आली आहे. सध्या डॉक्टर व ७५ बेड सज्ज आहेत. उर्वरित कामे आठवडाभरात पूर्ण होतील. याबाबत प्रशासनाकडून सूचना आल्यानंतर आणखी बदल करता येतील. डॉ. एन.एस. चव्हाण, जिल्हा शल्यचिकित्सक

हे देखील वाचा :

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---