⁠ 
शनिवार, जून 15, 2024

मोदी सरकारला नऊ वर्षे पूर्ण : भारतीय जनता पक्षाची दुचाकी रॅली

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १ जुलै २०२३ । केंद्रातील मोदी सरकारला नऊ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त आज भारतीय जनता पक्षातर्फे शहरातून दुचाकी रॅली काढण्यात आली.

देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्र सरकारला नऊ वर्षे पूर्ण झाले आहेत. या निमत्ताने देशभरात भाजपा मार्फत मोदी ऍट ९ महाजनसंपर्क अभियान सुरू आहे. या अनुषंगाने भाजपा भुसावळ तर्फे भव्य बाईक रॅली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाला खासदार रक्षा खडसे व आमदार संजय सावकारे यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी खासदार रक्षा खडसे व आमदार संजय सावकारे यांनी भाजपा भुसावळ तालुका पदाधिकार्‍यांसह नाहाटा चौक येथून भव्य बाईक रॅली सुरवात केली. ही फेरी रेल्वे लोखंडी पूल खालून, गांधी स्मारक, मामाजी टॉकीज मार्गे नवशक्ती ऑर्केड येथे आली. येथे उपस्थित भाजपा कार्यकर्त्यांसोबत चहापाणी व अल्पोहार करण्यात आला.

यावेळी खासदार रक्षा खडसे व आमदार संजय सावकारे यांच्यासह तालुकाध्यक्ष भालचंद्र पाटील, शहराध्यक्ष परीक्षित बर्‍हाटे, ज्येष्ठ पदाधिकारी युवराज लोणारी, राजेंद्र आवटे, भाजयुमो शहराध्यक्ष अनिरुद्ध कुलकर्णी यांच्यासह भाजपा पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.