⁠ 
शुक्रवार, एप्रिल 26, 2024

वृद्धाला मारहाण करीत मोबाईल चोरी : झारखंडची टोळी पोलिसांच्या जाळ्यात

जळगाव लाईव्ह न्यूज । १२ एप्रिल २०२३ । बाजारातील गर्दी पाहून तसेच वयोवृद्धांना एकांतात गाठून मोबाईल अलगदरीत्या लांबवणार्‍या झारखंड राज्यातील टोळीच्या रामानंद नगर पोलिसांनी मुसक्या बांधल्या आहेत. संशयित आरोपींकडून चोरीचे 15 मोबाईल जप्त करण्यात आले. तुफान रघू रीखीयासन (30, पुरानाभट्टागाव) व बारीश अर्जुन महतो (35, रा.महाराजपुर नया टोला कल्याणी, जि.साहेबगंज झारखंड) यांना अकोला येथून अटक करण्यात आली तर तीन अल्पवयीन मुलांनाही ताब्यात घेण्यात आले.

गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता
शहरातील दादावाडीतील वृद्ध मोबाईल दुरुस्त करण्यासाठी सोमाणी मार्केटमध्ये जात असताना आठवडे बाजारपट्ट्यात अनोळखी चार इसमांनी वृद्धाचा रस्ता अडवत त्यांना मारहाण करीत त्यांच्या खिशातून मोबाईल हिसकावला होता. यावेळी वयोवृद्धाने आरडाओरड केल्यामुळे परिीरातील नागरीकांनी मोबाईल हिसकाविणार्‍या तिघांना पकडून ठेवले होते तर त्यांचा एक साथीदार पसार झाला होता. याप्रकरणी रामानंदनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. ताब्यात घेतलेल्या तिघांची कसून चौकशी केली असता त्यांनी पळून गेलेला साथीदार अकोला येथे गेल्याची माहिती दिली.

त्यानंतर पथकाने धाव घेत तुफान रघू सिखीयासन याला ताब्यात घेतले त्याच्याकडून दोन मोबाईल हस्तगत केले व त्यानंतर त्याने टोळीतील दुसरा साथीदार बारीश अर्जुन महतो या संशयिताला शेगाव येथून ताब्यात घेतले असता त्याच्या घरातून 13 महागडे मोबाईल जप्त करण्यात आले. याप्रकरणी रामानंदनगर पोलिसात सोमवारी दुपारी गुन्हा दाखल करण्यात आला.