जळगाव लाईव्ह न्यूज । ६ जानेवारी २०२१ । रस्त्याने पायी चालणाऱ्या तरुणाच्या वरच्या खिश्यामधून मोबाईल व ३०० रुपये, असा १३ हजार रुपयांचा मुद्देमाल हिसकावल्याची घटना घडली. ही घटना अमळनेर येथील गांधलीपुरा भागातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ घडली. याप्रकरणी अमळनेर पोलिसांत गुन्हा दाखल झाला.
याबाबत गजेंद्र कुमारसिंग पाटील (रा.पात्री जवखेडा, ता.जि. जळगाव) यांनी फिर्याद दिली. ४ रोजी रात्री ते गांधलीपुरा परिसरात क्रूझर गाडीने (क्र.एम एच ०६-ए.एफ.०५२०) ने आले होते. सुभाष चौकात गाडी लावून ते शेतकी संघ रस्त्याने पायी जात होते. त्यावेळी पाठिमागून आलेल्या अज्ञात संशयिताने वरच्या खिशातील १० हजारांचा मोबाईल व पॅन्टच्या खिशातील पाकिट हिसकावून नेले.
पाकिटात ३०० रुपये, वाहन चालक परवाना व आधारकार्ड होते. याप्रकरणी कलम ३९२ नुसार गुन्हा दाखल झाला. पुढील तपास पोलिस हेड कॉन्स्टेबल शरीफ पठाण करत आहेत. अज्ञात चोरट्याचा पोलिस शोध घेत आहेत. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.
हे देखील वाचा :
- आज माझा ‘तो’ अंदाज तंतोतंत खरा ठरवला; उद्धव ठाकरेंबाबत गिरीश महाजन काय म्हणाले..
- ग्राहकांचे दिवाळ निघणार! जळगाव सुवर्णपेठेत सलग चौथ्या दिवशी सोने महागले, चांदीही वधारली
- वातावरण पुन्हा बदलणार; जळगाव जिल्ह्यात आगामी दोन दिवस असं राहणार हवामान?..
- तुमच्या राशीसाठी आजचा दिवस शुभ की अशुभ जाणार? अवश्य वाचा शनिवारचे राशीभविष्य
- Jalgaon : तरुणाच्या खात्यातून एक लाख गायब; सायबर ठगांनी अशी केली फसवणूक?