आमदार गुडघ्याला बाशिंग बांधून बसले आहेत पण मंत्रिमंडळ विस्तार होणार कधी ?
जळगाव लाईव्ह न्यूज । २१ ऑक्टोबर २०२२ । “मंत्रिमंडळ विस्तारासाठी शिंदे फडणवीस गटातील आमदार गुडघ्याला बाशिंग बांधून बसले आहेत,पर्यायी त्यांची अस्वस्थता आता बाहेर पडत आहे,” असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, आमदार एकनाथ खडसे यांनी केला आहे.
एकनाथ खडसे म्हणाले कि, “मंत्रिमंडळ विस्तार लवकर होईल,आपली मंत्रिमंडळात वर्णी लागेल, अशी अपेक्षा शिंदें फडणवीस सरकार मधील सर्व आमदारांची आहे, मात्र विस्तार लांबत असल्याने आपली संधी जाते की काय या विचाराने त्यांची अस्वस्थता वाढत असून ती आता बाहेर पडू लागली आहे. सरकार मधील ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी राज्यातील एक हजार कोटींची कामे रद्द केली त्यामुळे सर्व पक्षीय आमदार नाराज आहेत,”
याच बरोबर”जिल्हाधिकारी यांनी राजकीय दबावाखाली भुसावळच्या नगरसेवकांवर आपत्रतेची कारवाई केली, तर मुख्यमंत्री यांनी आमच्या अपेक्षेप्रमाणे निर्णय दिला, ते आमच्या बाजूने निर्णय देतील, असे आम्हाला कधीच वाटले नव्हते, आणि तेच झाले असा खोचक टोलाही त्यांनी लगावला,