---Advertisement---
जळगाव शहर राजकारण

आमदार भोळेंची महापौर महाजनांच्या अर्जावर हरकत

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । २१ ऑक्टोबर २०२१ । जळगाव विकास सोसायटी मतदारसंघात आमदार सुरेश भोळे व महापौर जयश्री महाजन यांच्यात लढत रंगणार आहे. त्याआधी बुधवारी आमदार सुरेश भोळे यांनी महापौर जयश्री महाजन यांच्या उमेदवारी अर्जावर आक्षेप घेतला असून, यावर सुनावणी प्रक्रिया देखील पूर्ण झाली.

suresh bhole jayashree mahajan jpg webp

जळगाव शहरात विद्यमान आमदार सुरेश भोळे आणि आमदारकीच्या शर्यतीत असलेले मनपा विरोधी पक्षनेते सुनील महाजन यांच्यात सध्या स्पर्धा सुरू आहे. जिल्हा बँक निवडणुकीत देखील महाजन यांच्या पत्नी महापौर जयश्री महाजन यांनी व आ.सुरेश भोळे यांनी जळगाव विकास सोसायटी मतदार संघातून अर्ज दाखल केला आहे.

---Advertisement---

दिग्गजांच्या अर्जावर हरकती

छाननी दरम्यान खा.उन्मेश पाटील, खा.रक्षा खडसे, आ.संजय सावकारे, संतोष चौधरी, घनश्याम अग्रवाल, गुलाबराव देवकर, ऍड.रवींद्र पाटील, किशोर पाटील, राजीव देशमुख यांच्या उमेदवारी अर्जावर आक्षेप दाखल झाले आहेत. त्यामुळे उमेदवारांची कमी असलेले कागदपत्रे सादर करण्यासाठी चांगलीच धावपळ उडाली. उमेदवारांनी तातडीने आपल्या वकिलांना पाचारण करून, सुनावणी प्रक्रियेत आपली बाजू मांडली आहे. मात्र, निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी बाजू ऐकून आपला निकाल राखीव ठेवला आहे. आज त्यावर निर्णय होण्याची शक्यता आहे.

उमेदवारी अर्ज बाद झाल्याची चर्चा

जिल्हा बँकेत खासदार रक्षा खडसे, माजी आ.संतोष चौधरी व राष्ट्रवादीचे ऍड.रवींद्र पाटील यांचा उमेदवारी अर्ज बाद झाल्याची चर्चा दिवसभर सुरु होती. तसेच सोशल मीडियावर देखील याबाबतचे अनेक संदेश व्हायरल झाले होते. मात्र, याबाबत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---