जळगाव लाईव्ह न्यूज । २१ ऑक्टोबर २०२१ । उद्या २२ ऑक्टोबर रोजी शुक्रवारी सकाळी ९ वाजता राष्ट्रवादी पक्षाचे आ. रोहित पवार संत मुक्ताबाई समाधीस्थळाच्या जुन्या मंदिरात दर्शनासाठी येत आहेत. अशी माहिती रविंद्र पाटील यांनी दिली आहे.
अनेक वेळा आ. रोहीत पवार यांनी मुक्ताई दर्शनासाठी येण्याची इच्छा व्यक्त केली होती. तसेच स्वराजध्वज पूजन यात्रा मुक्ताबाई मंदिरात करण्यात आली. त्यावेळी येता न आल्याने उद्या २२ ऑक्टोबर रोजी शुक्रवारी सकाळी ९ वा आदिशक्ती मुक्ताबाई चरणी माथा टेकवण्यासाठी जुने मुक्ताबाई मंदीर श्रीक्षेत्र कोथळी मुक्ताईनगर येथे येणार असल्याची माहिती अध्यक्ष रविंद्र पाटील यांनी दिली.