जळगावच्या उज्ज्वल भविष्यासाठी नागरिकांनी मोठ्या संख्येने मतदान करावे ; आमदार राजूमामा भोळे यांचं आवाहन

जानेवारी 15, 2026 11:52 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । १५ जानेवारी २०२६ । जळगाव महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज सकाळी ७:३० वाजेपासून मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली असून या लोकशाहीच्या उत्सवात शहराचे आमदार राजूमामा भोळे यांनी सकाळीच सहपरिवार मतदानाचा हक्क बजावला आहे. यावेळी त्यांनी शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आणि उज्ज्वल भविष्यासाठी नागरिकांनी घराबाहेर पडून मोठ्या संख्येने मतदान करावे, असं आवाहन केलं आहे.

RB matdan

शहरातील प्रभाग क्रमांक ७ अंतर्गत असलेल्या रोझलँड इंग्लिश मीडियम स्कूलमधील मतदान केंद्रावर जाऊन आपले मत नोंदवले.यावेळी आमदार भोळे यांच्यासोबत माजी महापौर सीमाताई भोळे, महायुतीकडून बिनविरोध निश्चित झालेले उमेदवार विशाल भोळे तसेच त्यांच्या कुटुंबातील सदस्य उपस्थित होते.

Advertisements

यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी जळगाव महापालिकेवर महायुतीचाच महापौर होणार असं जनतेनं ठरवलं आहे असं म्हणत जळगाव महापालिकेत महायुतीच्या 70 जागा येतील असा विश्वास आमदार राजूमामा भोळे यांनी व्यक्त केला आहे.

Advertisements

दरम्यान ​शहरातील विविध मतदान केंद्रांवर सकाळपासूनच मतदारांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळत असून सकाळच्या टप्प्यात मतदानाचा वेग समाधानकारक असून दुपारपर्यंत यात अधिक वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now