आमदार पाटीलांचा पाठपुरावा : अमळनेरात विविध विकासकामांसाठी एक कोटींची मंजुरी

जळगाव लाईव्ह न्यूज । ४ मे २०२२ । राज्य शासनाच्या वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून अमळनेरात आ.अनिल पाटील यांच्या प्रयत्नाने विविध विकास कामांसाठी एक कोटींची मंजुरी मिळवली आहे.

MAL jpg webp

तालुक्यातील जानवे येथे सभामंडप बांधकाम करणे(15 लक्ष), तळवाडे येथे (10 लक्ष), शेळाव बु. येथे चौक सुशोभिकरण करणे (10 लक्ष), शेळावे बु. येथे रस्ता कॉक्रीटीकरण करणे (10 लक्ष), न.प. हद्दीत प्रभाग क्र.3 मध्ये सामाजिक सभागृहाचे बांधकाम करणे (10 लक्ष), अंबापिप्री तर पारोळा तालुक्यातील सभामंडप बांधकाम करणे(20 लक्ष), दळवेल येथे रस्ता कॉक्रीटीकरण करणे/पेव्हर ब्लॉक करणे (15 लक्ष), भिलाली येथे रस्ता कॉक्रीटीकरण करणे/पेव्हर ब्लॉक करणे (10 लक्ष) सदर कामांच्या मंजुरी बद्दल आमदार अनिल पाटील यांनी मतदारसंघातील जनतेच्या वतीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे मंत्री धनंजय मुंडे, जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील आदींचे आभार व्यक्त केले आहेत. दरम्यान मतदारसंघात निधीचा वाढता स्त्रोत पाहता मोठया प्रमाणात विकासकामे होत असल्याने आमदार पाटील यांचे जनतेतून विशेष कौतुक होत आहे.

Advertisements

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now