---Advertisement---
गुन्हे जळगाव शहर

महावितरणच्या अधिकाऱ्याला मारहाण केल्याप्रकरणी आ.मंगेश चव्हाण यांची कारागृहात रवानगी

mangesh chavan
---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । ३० मार्च २०२१ । महावितरण अधिक्षक अभियंत्यांना खूर्चीत बांधून मारहाण केल्याच्या आरोपाखाली अटकेत असलेले चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण यांच्यासह ३१ जणांची आज नाशिक कारागृहात रवानगी केली आहे.

mangesh chavan

काय आहे प्रकरण?

---Advertisement---

शुक्रवारी २६ मार्च रोजी महावितरणच्या कार्यालयात आमदार चव्हाण यांच्यासह सुमारे ४० ते ५० जणांना जमाव गेला होता. यावेळी आमदारांसह जमावातील शेतकऱ्यांनी फारुख यांना दोरीने खुर्चीत बांधुन मारहाण केली. चपलांचा हार घातला. या प्रकरणी फारुख यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन शुक्रवारी रात्री आमदार चव्हाण यांच्यासह ४० ते ५० जणांवर एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात येऊन चव्हाणांसह ३१ जणांना अटक केली हीती. अटकेतील सर्व संशयितांच्या पोलिस कोठडीची मुदत मंगळवारी संपली. यामुळे त्यांना जिल्हा न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी पोलिसांकडून सर्व संशयितांच्या न्यायालयीन कोठडीची मागणी करण्यात आली होती. सुनावणीअंती न्यायालयाने सर्वांना न्यायालयीन कोठडी दिली.

जिल्हा कारागृहात क्षमतेपेक्षा जास्त कैदी असल्यामुळे आणखी ३१ जणांना ठेऊन घेणे गैरसोयीचे होणार होते. त्यामुळे आमदार चव्हाण यांच्यासह सर्व ३१ संशयितांना नाशिक कारागृहात हलवण्यात आले.न्यायालयीन कोठडीत रवानगी झाल्यानंतर आमदार चव्हाण यांच्यासह सर्व संशयितांतर्फे एकत्र जामीन अर्ज न्यायालयात दाखल करण्यात आला आहे.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---