⁠ 
मंगळवार, सप्टेंबर 17, 2024
Home | जळगाव जिल्हा | उन्मेष पाटीलांनी गायीची भाड खाल्ली; आमदार मंगेश चव्हाणांची उन्मेष पाटलांवर घणाघात

उन्मेष पाटीलांनी गायीची भाड खाल्ली; आमदार मंगेश चव्हाणांची उन्मेष पाटलांवर घणाघात

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ०५ सप्टेंबर २०२४ । चाळीसगावचे भाजपचे आमदार मंगेश चव्हाण यांनी ठाकरे गटाचे माजी खासदार उन्मेष पाटील यांच्यावर जोरदार खोचक टीका केलीय. “आमच्या मतदारसंघात या माणसाला कुत्र सुद्धा विचारत नाही ही परिस्थिती आहे. गाईला आई मानन्याची आमची संस्कृती आहे. आईच्या गायीच्या दुधात पैसे चोरणारी आम्ही औलाद नाही. आमच्यावर आरोप करणाऱ्या उन्मेष पाटील यांनी गायीची भाड खाल्ली. अशा शब्दात मंगेश चव्हाणांनी उन्मेष पाटीलांवर खोचक टीका केलीय.

कोरोनामध्ये जेव्हा लोक मरत होती तेव्हा या माणसाने कंपन्या चालू केल्या. हा माणूस सोयीचं राजकारण करतो. कधी गिरनेच्या नावाने, कधी नारपारच्या नावाने. त्याला फार महत्त्व देण्याची गरज नाही. हा माणूस बेभरवशाचा आहे. त्याला आमच्याकडे कुत्र सुद्धा विचारत नाही”, असा घणाघातही मंगेश चव्हाण यांनी उन्मेष पाटील यांच्यावर केली.

“उन्मेष पाटील म्हणजे पेपर फोडून पास होणारा हा पोरगा आहे. एखाद्या विषयाची माहिती घ्यायची आणि त्या माहितीच्या आधारे श्रेय लाटायचं. माझ्यामुळे शेतकऱ्यांना अनुदान मिळालं, असं म्हणायलाही हा माणूस कमी करणार नाही हा एकदम निर्लज्ज माणूस आहे. 10 वर्षात त्यांना गाय दिसली नाही, शेतकरी दिसला नाही आणि दूध दिसलं नाही. त्यांना कळालं की आता अडचणीतला दूध संघ त्यांनी नफ्यात आणला. शेतकऱ्यांचे उदो उदो करतील म्हणून श्रेय घेण्यासाठी त्यांनी केलं”, अशी टीका मंगेश चव्हाण यांनी केली.

यावेळी मंगेश चव्हाण यांनी आमदार एकनाथ खडसे यांच्या भाजप प्रवेशावरही प्रतिक्रिया दिली. “तीन वर्षात चारदा पक्ष सोडणे आणि पक्ष बदलणारा माणूस किती मोठा असू शकतो. प्रवेश कुठे झाला, काय झाला, याबाबत आम्हाला तर वरिष्ठांनी काही सूचना दिल्या नाहीत. त्यांच्यावर बोलण्या इतपत एवढा मोठा माणूस मी नाही. त्यांची निष्ठा किती आहे? तीन वर्षात चार वेळा पक्ष सोडणे आणि पक्ष बदलवणारा माणूस, किती मोठा असू शकतो त्यावर मी काय बोलू?”, अशी प्रतिक्रिया मंगेश चव्हाण यांनी दिली.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.