मतदारसंघातील कोविड १९ चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नियोजनाचा आढावा घेण्यासाठी आमदार सौ.लताताई चंद्रकांत सोनवणे यांनी चोपडा उपजिल्हा रुग्णालयाला दि.१० रोजी भेट दिली.तद्नंतर चोपडा शासकीय विश्रामगृह येथे संबंधित अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली.
त्यात प्रामुख्याने सध्या स्थितीत किती कोरोना बाधित रुग्ण आहेत. त्यातील किती लक्षणे असणारे आहेत किती लक्षणे नसणारे आहेत. त्यांना कोठे विलगीकरण केले आहे त्यांच्यावर काय उपचार सुरू आहेत. प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अखत्यारीत येणाऱ्या गावांची माहिती यावेळी आमदार सौ.लताताई सोनवणे यांनी जाणून घेतली.
तसेच लसीकरणाबाबत आदिवासी पाडा-वस्तीवर जाऊन प्रबोधन करण्याच्या सुचना संबंधित अधिकाऱ्यांना केल्या. प्रामुख्याने किती लोकांनी या लस घेतल्या, किती जणांचे दोन्ही डोस पूर्ण झाले. वयस्कर व्यक्तींच्या लसीकरणाची माहिती जाणून घेतली. लसीकरणानंतर घ्यावयाची औषध उपलब्ध आहेत का? तसेच कोरोना रोगापासुन दुर राहण्याकरिता घ्यावयाची काळजी याबाबत गावातील जनतेला मार्गदर्शन करावे तसेच आरोग्य कर्मचारी यांनी सुध्दा काळजी घेण्याचे आवाहन केले.
याप्रसंगी डॉ.मनोज पाटील, डॉ.प्रदीप लासूरकर,श्रीमती पूनम राणे उपमुख्यधिकारी, नपा प्रशासन अधिकारी निलेश ठाकूर, सहा.गट विकास अधिकारी श्रीमती एन. पी. जाधव, शिवसेना तालुका प्रमुख राजेंद्र पाटील, शहर प्रमुख आबा देशमुख, संघटक सुकलाल कोळी,जि.प.सदस्य हरीश पाटील,पं.स.माजी उपसभापती एम.व्ही. पाटील, नगरसेवक प्रकाश राजपूत, किशोर चौधरी, सुनील पाटील, तुषार पाटील, अॅड. शिवराज पाटील, गणेश पाटील,वरगव्हाण सरपंच भुषण पाटील उपस्थित होते.