⁠ 
शुक्रवार, एप्रिल 26, 2024

जळगावात वाळूच्या डंपरची शिंदे गटाच्या आमदारांच्या कारला जोरदार धडक, कारचा चक्काचूर..

जळगाव लाईव्ह न्यूज । २८ मे २०२३ ।  शिवसेना शिंदे गटाच्या आमदार लता सोनवणे यांच्या कारला भीषण अपघात झाल्याची घटना रात्री घडलीय. जळगाव तालुक्यातील करंज गावाजवळ वाळूच्या भरधाव डंपरने आमदार सोनवणे यांच्या कारला धडक दिली. यात आ.लताताई सोनवणे आणि त्यांचे पती माजी आमदार प्रा. चंद्रकांत बळीराम सोनवणे बालंबाल बचावल्या आहेत. आमदार सोनवणे यांचे पती माजी आमदार चंद्रकांत सोनवणे यांना मुका मार लागला आहे.

आमदार लताताई सोनवणे आणि माजी आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे हे आपल्या वाहनाने चोपडा तालुक्यातील कार्यक्रम आटोपून जळगावकडे येत असतांना करंज गावाजवळ त्यांच्या वाहनाला अपघात झाला. त्यांच्या कारला एमएच १९- झेड ६२४५ क्रमांकाच्या डंपरने धडक दिली. सुदैवाने या अपघातात कुणाला गंभीर दुखापत झाली नाही. द

या अपघातानंतर वाळूच्या डंपर चालकाने घटनास्थळावरून पळ काढला. डंपरने समोरून धडक दिल्याने आमदार सोनवणे यांच्या कारच मोठ नुकसान झालंय. या घटनेच्या निमित्ताने जळगाव जिल्ह्यातील अवैध वाळू वाहतुकीचा प्रश्न पुन्हा एकदा एरणीवर आला आहे. यामुळे वाळू तस्करांना आळा नेमका केव्हा बसणार ? असा प्रश्‍न आता विचारण्यात येत आहे.