---Advertisement---
राजकारण महाराष्ट्र

आमदार किशोर पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल, म्हणाले

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । २३ ऑक्टोबर २०२२ ।आ किशोर पाटील यांनी नाव न घेता अजित पवारांवर जोरदार हल्ला चढवला आहे.यावेळी ते असे म्हणाले कि, मला असं वाटतं या चोराच्या उलट्या बोंबा आहेत. स्वत: काही करायचं नाही आणि राज्यकर्ते करतात तर त्यांच्यावर टीका करायची. मी पिंपळगाव हरेश्वरला जाऊन किटचं वाटप करून कार्यक्रमाचं उद्घाटन केलं. तिथले गरजू लोक समाधानी होते. तुम्ही एकदा गोर गरिबांमध्ये फिरा म्हणजे तुम्हाला कळेल

राज्यात सध्या आनंदाची शिधा वाटपावरून वातावरण चांगलचं तापलं आहे. राज्य सरकारच्या वतीने दिवाळीनिमित्त गरजुंना शंभर रुपयांमध्ये वस्तुंचे वाटप होते. ज्यामध्ये साखर, तूप, तेल, गूळ आणि डाळ यांचा समावेश आहे. मात्र यामध्ये भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. विरोधकांच्या या आरोपाला शिंदे गटाचे आमदार किशोर पाटील यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.नाव न घेता विरोधी पक्षनेते अजित पवार यांना टोला लगावला आहे.

kishore patil and ajit pawar jpg webp


याच बरोबर आ किशोर पाटील असे हि म्हणाले कि, गरिंबाना दिवाळी गोड करण्यासाठी शंभर रुपयांत साखर , दाळ, गुळ, तूप, तेल या वस्तू मिळत आहेत. आणि तुम्ही म्हणता त्यामध्ये भ्रष्टाचार होतो. या किटवर शंभर रुपये छापील किंमत आहे. याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील सांगितलं आहे की आम्ही 100 रुपयांत गरिबांना वस्तुचे वाटप करत आहोत. मग यात भ्रष्टाचार कुठे झाला? असा सवाल त्यांनी यावेळी विचारला.

---Advertisement---

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---