⁠ 
रविवार, नोव्हेंबर 24, 2024
Home | जळगाव जिल्हा | मंत्री चंद्रकांतदादांना पाठवलेल्या बदामावरून आमदार चंद्रकांत पाटीलांचा रोहिणी खडसेंवर टोला

मंत्री चंद्रकांतदादांना पाठवलेल्या बदामावरून आमदार चंद्रकांत पाटीलांचा रोहिणी खडसेंवर टोला

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ३० जून २०२४ । राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या नेत्या रोहिणी खडसे यांनी राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांना बदाम पाठवत असल्याचं वक्तव्य केलं. मुलींच्या मोफत शिक्षणाच्या घोषणेची आठवण व्हावी म्हणून त्यांनी बदाम पाठवले. यावरून आता मुक्ताईनगरचे शिंदे गटाचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी रोहिणी खडसे यांचं नाव न घेता त्यांच्यावर निशाणा साधला. खऱ्या अर्थाने त्यांच्याच पक्षातल्या नेत्यांना बदाम खाण्याची आवश्यकता असल्याची टीका त्यांनी केली आहे.

आमदार चंद्रकांत पाटील म्हणाले की, खऱ्या अर्थाने उच्च शिक्षणाबाबत अधिवेशनामध्ये महत्वाकांक्षी योजना मंजूर झाली आहे. यासाठी रोहिणी खडसेंनी चष्मा लावायला हवा. चष्म्याचा आकडा बदलावा मग दिसेल. लोकांना बदाम पाठवण्यापेक्षा आपल्याच पक्षातल्या लोकांना आपल्या शेतातील बदाम आणि खजूर पाठवा. त्यांच्याच पक्षातल्या नेत्यांना बदाम खाण्याची आवश्यकता असल्याचा टोला त्यांनी लगावला आहे.

प्रसिद्धी मिळवण्यासाठी हे उद्योगधंदे
ते पुढे म्हणाले की, जयंत पाटील यांनाच बदाम पाठवा. त्यांना खुराकाची गरज आहे. खजूर तर तुमच्या शेतात आहेत. ते तुमच्या पक्षातल्या लोकांना पाठवा. सरकार चांगलं काम करत आहे. त्यामुळे विरोधकांच्या पायाखालची जमीन सध्या सरकत चालली आहे. प्रसिद्धी मिळवण्यासाठी हे उद्योगधंदे सुरू आहेत. आपल्या घरात सरकार आहे. केंद्रीय मंत्रीपद देखील घरात आहे. बसून सरकारच्या हिताचे निर्णय घ्या, असेही चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.