रहस्यमयरीत्या बेपत्ता झालेली धनश्री मृतावस्थेत आढळली; चाळीसगाव तालुक्यात खळबळ

डिसेंबर 16, 2025 4:58 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । १६ डिसेंबर २०२५ । जळगावच्या चाळीसगाव तालुक्यामधून एक हादरवून सोडणारी घटना समोर आलीय. ज्यात तरवाडे बुद्रुक येथे शाळेतून घरी जाताना रहस्यमयरीत्या बेपत्ता झालेली 9 वर्षीय धनश्री उमेश शिंदे हि गावाजवळील एका विहिरीत मृतावस्थेत आढळली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

dhanshree shinde

नेमकी घटना काय?

Advertisements

तरवाडे बुद्रुक (ता. चाळीसगाव) येथे शुक्रवारी (१२ डिसेंबर) शाळेतून घरी येताना धनश्री शिंदे ही रहस्यमयपणे गायब झाली होती. ती जिल्हा परिषद शाळेत चौथीच्या वर्गात शिकत होती. सकाळी १० वाजता शाळेत गेलेली धनश्री सायंकाळी घरी परतलीच नाही. आई-वडील शेतातून घरी परतल्यानंतर मुलगी न आढळल्याने शाळेत चौकशी केली असता, सायंकाळी पाच वाजेपर्यंत ती शाळेत होती व नंतर घरी निघाल्याचे शिक्षकांनी सांगितले.

Advertisements

ग्रामपंचायतीच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये सायंकाळी सुमारे 4.55 वाजता ती ग्रामपंचायत कार्यालयाजवळून जाताना दिसून आली होती. त्यानंतर गावाबाहेरील शेत रस्त्यावर तिचे दप्तर आढळून आल्याने अपहरणाचा संशय बळावला होता. दरम्यान, आज गावालगतच्या शिवारातील एका विहिरीत धनश्रीचा मृतदेह आढळून आलाय. घटनेची माहिती मिळताच जळगाव एलसीबीचे पथक व वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत.

विहिरीतून मृतदेह बाहेर काढण्याचे काम सुरू आहे. या प्रकरणी चाळीसगाव तालुका पोलीस ठाण्यात आधीच गुन्हा दाखल असून, मृत्यूचे नेमके कारण आणि घटनेमागील परिस्थितीचा सखोल तपास एलसीबी व पोलीस प्रशासनाकडून करण्यात येत आहे. 60 ते 70 तासांहून अधिक काळ चाललेल्या शोधमोहीमेचा दुर्दैवी शेवट झाल्याने कुटुंबीयांचा आक्रोश अनावर झाला असून संपूर्ण गाव शोकसागरात बुडाले आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now