जळगाव लाईव्ह न्यूज । ५ जून २०२३ । ओडिशा येथे झालेल्या भीषण रेल्वे अपघातात तब्बल २८० जणांचा मृत्यू झाला आहे. या ट्रेनमधून काही लोक नोकरी साठी प्रवास करत होते तर काही लोक आपल्या परिवाराला भेटण्यासाठी जात होते. आणि हा प्रवास त्यांचा अखेरचा प्रवास ठरला आहे. मात्र एकूण मृतांपैकी काहीच मृतांची ओळख पटू शकली आहे. यातच एका व्यक्तीने तर आपलं अक्ख कुटुंब या रेल्वे अपघातात संपताना पहिल आहे. (family dead in train accident)
४८ वर्षाचे विनोद हे बालासोर (balasore train accident) मध्येच राहतात. जिथे हा या[अपघात झाला तिथे ती ठिकाण बालासोरच आहे. या अपघातात त्याची पत्नी झरना दास, मुलगी विष्णुप्रिया दास, आणि मुलगा संदीप दास यांचा मृत्यू झाला आहे. हे तिघेही कटक येथे डॉक्टरकडे जात होते. मात्र त्यांच अपघाती निधन झालं. अश्यावेळी विनोद दास यांना ५० हजार रुपये कॅश तर ९ लाख ५० हजाराचा चेक मिळाला आहे. (oddisa train accidet )
यावेळी विनोद दास याने एका वेबसाईटशी बोलताना सांगितले कि, माझी पत्नी, मुलगा आणि मुलगी यांचे या अपघातात निधन झाले आहे. अपघात झाला आहे हे मला माझ्या जावयाकडून समजले. आम्ही सगळीकडे त्यांचा शोध घेतला. काल दुपारी १२ वाजता मला माझ्या बायकोचा मृतदेह मिळाला. मी मिळालेल्या पैश्याचे काय करणार? माझं अक्ख कुटुंब मला सोडून गेलं आहे. (train accident balasore)
झालेल्या दुर्घटने बाबत रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी मोठी माहिती दिली आहे. यात त्यांनी सांगितले आहे कि, इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंगमुळे अपघात झाला आहे. आपघाताची कारणे आणि त्याला जबाबदार कोण आहेत हे शोधण्यात आले असुन तपास पूर्ण होण्याची वाट पहिली जात आहे.