⁠ 
मंगळवार, डिसेंबर 10, 2024
Home | जळगाव जिल्हा | नागरिकांच्या पैश्याची मनपा कडुन उधळपट्टी : नवी कोरी स्टेश्नरी काढली रद्दीत

नागरिकांच्या पैश्याची मनपा कडुन उधळपट्टी : नवी कोरी स्टेश्नरी काढली रद्दीत

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १७ जून २०२३ | नागरिकांकडून कर स्वरूपात वसुल केलेल्या पैश्यांची महापालिका प्रशासनाकडून उधळपट्टी केली जात आहे. महापालिकेने मोठ्या प्रमाणावर नवी स्टेशनरी रद्दीत विक्री केल्यामुळे मनपा प्रशासनावर कोणाचा वचक आहे की, नाही असा प्रश्न उपस्थित होत आहे.

महानरपालिका कर्जबाजारी असल्यामुळे मुलभूत सुविधा देखील पुरविण्यात मनपाचे अधिकारी हतबदला दाखवित होते. शहरवासियांना नागरी सुविधा पुरवितांना मनपा प्रशासनाकडून महापालिकेची आर्थिक परिस्थिती नाही, असे रडगाणे गाईले जात होते. तर दुसरीकडे गरज नसतांना प्रशासनाकडून अतिरिक्त खर्च केला जात असल्याची माहिती समोर आली आहे. मनपाची आर्थिक परिस्थिती बिकट असतांना प्रशासनाने आवश्यकता नसतांना मोठ्याप्रमाणात स्टेशनरी खरेदी केली होती.

ही स्टेशनरी अनेक महिन्यापासून मनपाच्या इमारतीत धूळखात पडलेली होती. त्या स्टेशनरीचा वापर होत नसल्यामुळे मनपा प्रशासनाकडून ती सर्व नवी स्टेशनरी रद्दत विक्रीसाठी काढली आहे. जनतेच्या पैशांची अशा पध्दतीने उधळपट्टी होत असल्यामुळे नगरसेवकांकडून प्रशासनाविषयी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत.

जनतेला सुविधा पुरविण्यासाठी पैसा नाही शहरवासियांना नागरी सुविधा पुरवितांना मनपा प्रशासनाकडून महापालिकेची आर्थिक परिस्थिती नाही, असे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत असते. मात्र, दुसरीकडे आवश्यकता नसतांना नको त्या ठिकाणी महापालिकेकडून अवाजवी खर्च केला जात आहे.

author avatar
टीम जळगाव लाईव्ह