जळगाव हादरला! रात्री लघुशंकेसाठी घराबाहेर आली, पाळत ठेवणाऱ्या तरुणाने तोंड दाबून बंद घरात नेलं, अन्.. मुलीवर पाशवी अत्याचार

ऑगस्ट 3, 2025 11:31 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । ३ ऑगस्ट २०२५ । राज्यात अल्पवयीन मुलींवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटना काही कमी होताना दिसत नसून जळगाव जिल्ह्यातून खळबळजनक प्रकार समोर आलाय. ज्यात लघुशंकेसाठी रात्री घराबाहेर अंगणात गेलेल्या एका अल्पवयीन मुलीवर अत्याचाराची घटना चोपडा तालुक्यात घडली. संशयित नराधमाने मुलीचे तोंड दाबून तिला जबरदस्तीने अंधारात ओढत नेऊन एका बंद घरात तिच्यावर पाशवी अत्याचार केल्याच्या घटनेने मोठी खळबळ उडाली आहे. याप्रकरणात संशयित तरुणाला पोलिसांनी अटक केली असून त्याला न्यायालयात हजर केले असता नराधमाला न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

crime 1 jpg webp

याबाबत असे की, चोपडा तालुक्यातील सातपुड्यात असलेल्या जिरायतपाडा येथे वास्तव्यास असलेले पीडित कुटुंबातील सर्वजण झोपी गेले. याच दरम्यान रात्री ११ वाजता १४ वर्षीय अल्पवयीन मुलगी लघुशंकेसाठी घराच्या बाहेर अंगणात आली असता ती घरात परत आलीच नाही म्हणून मुलीच्या वडिलांनी रात्रभर जिरायतपाडा गावात शोधाशोध केली परंतु ती कुठेच आढळून आली नाही.

Advertisements

आई,वडिलांसह सर्वच कुटुंब चिंतेत असतांना अंधारात अल्पवयीन मुलगी पहाटे चार वाजेच्या सुमारास घाबरलेल्या अवस्थेत रडत घरी परतली. यावेळी वडिलांनी अल्पवयीन मुलीला विचारले असता तिने सांगितले की,लघुशंकेसाठी घराच्या बाहेर अंगणात गेली असता माझेवर पाळत ठेवणाऱ्या गावातील तरुणाने दोन्ही हातांनी माझे तोंड व हात बांधून जबरदस्तीने अंधारात ओढत नेऊन मुलीच्या नातेवाईकाच्या बंद असलेल्या घरात तब्बल पाच तास डांबून ठेवत पहाटे ४ वाजेपर्यंत पाशवी अत्याचार केला. त्यानंतर संशयित तरुणाने मला घरापर्यंत सोडले अशी आपबिती अल्पवयीन मुलीने सांगितली. अत्याचाराच्या घटनेने प्रचंड खडबळ उडाली आहे.

Advertisements

या प्रकरणी अल्पवयीन मुलीचे वडिल यांच्या फिर्यादीवरून ग्रामीण पोलीस स्टेशनला स्नेहल दिलीप पावरा याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून,अटक करण्यात आली आहे.पुढील तपास डीवायएसपी आण्णासाहेब घोलप, ग्रामीणचे पोलीस निरीक्षक महेश टाक यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि. शेषराव नितनवरे करीत आहेत.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now