धक्कादायक ! अत्याचारातून अल्पवयीन मुलगी गर्भवती, तरुणाला अटक

ऑगस्ट 28, 2025 11:23 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । महिलांसह अल्पवयीन मुलींवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटना काही केल्या कमी होताना दिसत नसून नराधमांना किंवा आरोपींना कायद्याचा धाकच राहिला नसल्याचं दिसत आहे. यातच प्रेम जाळ्यात ओढून तरुणीवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटना देखील मोठ्या प्रमाणात समोर येत आहे. अशातच जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यातून एक धक्कादायक प्रकार समोर आलाय. ज्यात १७ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार करण्यात आला. वैद्यकीय तपासणीत ही अल्पवयीन मुलगी गरोदर असल्याचे आढळून आले. या प्रकरणी आरोपीला अटक करण्यात आली आहे.

rape crime

अविनाश वेस्ता पावरा (२२, रा. अंमलवाडी, पो. उमर्टी, ता. चोपडा) असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे. त्याला अमळनेर येथील अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाने तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. पोलिस सूत्रांनुसार, बाहेरच्या तालुक्यातील ही अल्पवयीन मुलगी बारावीत शिक्षण घेत आहे.

Advertisements

संशयिताने जानेवारी २०२३ मध्ये चोपडा शहरातील शिरपूर रोडवरील एका हॉस्पिटलच्या मागे तसेच पीडितेच्या मैत्रिणीच्या खोलीत चारवेळा अत्याचार केला. तसेच २६ जून २०२५ रोजी सुमारास शिरपूर रोड झाडझुडपांमध्येही अत्याचार केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. पीडित मुलीच्या फिर्यादीवरून संशयिताविरुद्ध चोपडा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Advertisements

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now