राज्यमंत्री बच्चु कडू यांच्या हस्ते दिव्यांगांना १६ रोजी साहित्य वाटप
जळगाव लाईव्ह न्यूज । १५ नोव्हेंबर २०२१ । शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चु कडू हे दि.१६ रोजी चाळीसगाव दौऱ्यावर येत आहेत. यावेळी त्यांच्या हस्ते अपंग, दिव्यांग व परितक्त्या यांना तीन चाकी सायकल, शिलाई मशीन यासह विविध साहित्याचे वाटप करण्यात येणार आहे.
राज्याचे शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चु कडू यांचे दि.१६ रोजी चाळीसगाव शहरात आगमन होणार आहे. यावेळी त्यांच्या हस्ते चाळीसगाव तालुक्यातील अपंग दिव्यांग व परितक्त्या यांना तीन चाकी सायकल, शिलाई मशीन, अपंगांसाठी कुबड्या व अंधांसाठी काठीचे वाटप करण्यात येणार आहे. कार्यक्रमाचे आयोजन मीनाक्षी निकम यांच्या संकल्पनेतून वर्धमान धाडीवाल मित्र परिवारच्यावतीने करण्यात आले आहे. वाटप करण्यात येणारे साहीत्य वर्धमान धाडीवाल मित्र परिवार यांच्यामार्फत दिले जाणार आहे.
दि.१६ रोजी महाराणा प्रताप राजपूत समाज मंगल कार्यालय येथे दुपारी ३ वाजता या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमास प्रहार जनशक्ती संघटनेचे उत्तर महाराष्ट्र प्रमुख अनिल चौधरी देखील उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमास चाळीसगाव तालुक्यातील नागरिकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.