⁠ 
मंगळवार, मे 7, 2024

मंत्री गुलाबभाऊ निघाले मंत्री गिरीशभाऊंपेक्षा वरचढ ! कसे ? वाचा सविस्तर

जळगाव लाईव्ह न्यूज । २४ मे २०२३ । जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील हे मंत्री गिरीश महाजन यांच्याहून वरचढ निघाले आहेत. याचे कारण म्हणजे पालकमंत्री म्हणून मंत्री गुलाबराव पाटील यांनी जानेवारी ते एप्रिल या कालावधीत सर्वाधिक दौरे जिल्ह्यातच केले आहेत.

त्यामुळे ते जिल्ह्यासह स्वत:च्या मतदारसंघातच सातत्याने दौरे करत असल्याचे स्पष्ट झाले आहे. मात्र बुलडाणा, वाशिम, हिंगोली, परभणी, धुळ्याचे पालकमंत्री असलेले जामनेर येथील रहिवासी ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन हे या जिल्ह्यांमध्ये दौरे करत नाहीयेत असे म्हटले जात आहे. ते
सतत राज्य व राज्याबाहेर दौऱ्यावर आहेत.

तक्रारी त्याअनुषंगाने जळगावच्या पालकमंत्र्यांनी गेल्या चार महिन्यांत १८ दौरे केले आहेत. त्यात सर्वाधिक दौरे जळगाव ग्रामीण मतदारसंघात केले आहेत.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गेल्या चार महिन्यात तीन दौरे केले आहेत. त्यात जळगाव शहर, भोकर (जळगाव), पारोळा, पाचोऱ्यासह अन्य ठिकाणी दौरे केले आहेत. विकासकामांसह एका लग्नसोहळ्याला त्यांनी उपस्थिती दिली आहे. गेल्या चार महिन्यांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, उदय सामंत, दादा भुसे, अब्दुल सत्तार, सुधीर मुनगंटीवार, गिरीश महाजन यांच्यासह काही राज्यमंत्र्यांनी जिल्ह्यात दौरे केले आहेत