जळगावच्या ग.स.संस्थेला सहकार मंत्री बाबासाहेब पाटलांची सदिच्छा भेट

मे 30, 2025 11:02 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । राज्याचे सहकार मंत्री बाळासाहेब पाटील जळगाव दौऱ्यावर आले असताना त्यांनी जळगाव जिल्हा सरकारी नोकरांची सहकारी पतपेढी लि. जळगांव (ग.स. सोसायटी) या संस्थेला दि २९ रोजी सदिच्छा भेट दिली. यावेळी ना. बाबासाहेब पाटील यांचा सत्कार संस्थेचे अध्यक्ष अजबसिंग पाटील यांनी शाल, पुष्पगुच्छ देवुन केला.

gs sanstha visit babasaheb patil

संस्थेचा सत्कार स्विकारत ना. बाबासाहेब पाटील यांनी संस्थेची आर्थिक प्रगती व कामकाज पाहुनसमाधान व्यक्त केले. आपल्या भाषणात त्यांनी संचालक मंडळास व संस्थेस पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

यांची होती उपस्थिती?
सदर प्रसंगी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार अनिल दादा पाटील, माजी मंत्री गुलाबरावजी देवकर, जे.डी.सी.सी. बँकेचे अध्यक्ष संजय पवार, व्हि. झेड बापु पाटील यांचा देखील शाल पुष्पगुच्छ देवुन यथोचित सत्कार करण्यात आला. सदरील कार्यक्रमास संस्थेचे अध्यक्ष अजबसिंग पाटील, उपाध्यक्ष ए.टी. पवार, संस्थेचे संचालक उदय पाटील, अजयराव सोमवंशी, योगेश सनेर, सुनिल सुर्यवंशी, महेश पाटील, मनोज माळी, भाईदास पाटील, योगेश इंगळे, अनिल गायकवाड, अजय देशमुख, विजय पवार, रागिणी चव्हाण, विजय पाटील, मनोजकुमार पाटील व्यवस्थापक वाल्मीक पाटील तसेच संस्थेचे बहुसंख्य कर्मचारी उपस्थित होते.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment