लाडकी बहीण योजनेबाबत मंत्री आदिती तटकरेंची मोठी घोषणा..

जानेवारी 24, 2026 11:50 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । राज्य सरकारकडून राज्यातील गरीब आणि गरजू महिलांसाठी लाडकी बहीण योजना सुरु केली असून या योजनेअंतर्गत गेल्या दीड वर्षांपासून पात्र लाभार्थी महिलांना दरमहा 1500 रुपये दिले जाता आहे. थेट पात्र महिलांच्या बँक खात्यात ही रक्कम जमा होत आहे. मात्र सध्या ही योजना वादाच्या भोवऱ्यात सापडली असून लाडकी बहीण योजनेतून अनेक लाभार्थ्यांना डिसेंबरचा हप्ता जमा झालेला नाही. लाभार्थ्यांनी केवायसी करुनही त्यांच्या खात्यात पैसे जमा झाले नाहीत. यावर आता राज्य सरकारने यावर तोडगा काढला आहे.महिलांची प्रत्यक्ष पडताळणी करण्याच्या सूचना दिल्या आहे. त्यानंतर आता पुन्हा आदिती तटकरेंनी मोठी घोषणा केली आहे.

ladki bahin

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांच्या सुविधेसाठी विशेष हेल्पलाइन नंबर जारी करण्यात आला आहे. त्याव कॉल करून त्यांच्या कोणत्याही शंकांचं निरसन करण्यात येणार आहे. आवश्यकता असेल तर लाडक्या बहिणींनी या या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क करावा, असं आदिती तटकरे यांनी त्यांच्या ट्विटमध्ये नमूद केलं आहे.

Advertisements

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची e-KYC प्रक्रिया करत असताना काही कारणास्तव चुकीचा पर्याय निवडल्याने लाभ स्थगित झाल्याच्या काही तक्रारी विभागास प्राप्त झाल्या आहेत. या व योजनेशी संबंधित इतरही तक्रारींचे, शंकांचे फोन कॉलवर निवारण करण्यासाठी 181 या महिला हेल्पलाइन नंबरवर मदत उपलब्ध करून देण्यात आली आहे. याबाबत संबंधित कॉल ऑपरेटर्सना योग्य ते प्रशिक्षणही देण्यात आले आहे. योजनेशी संबंधित सर्व तक्रारींचे व शंकांचे निरसन 181 या हेल्पलाईन नंबरवरून करण्यात येणार आहे.

Advertisements

तरी, सर्व लाडक्या बहिणींनी आवश्यकता भासल्यास या सुविधेचा लाभ घ्यावा ही नम्र विनंती- असं त्यंनी आपल्या ट्विटमध्ये नमूद केलं आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now