---Advertisement---
जळगाव शहर

जळगाव दूध संघात अत्याधुनिक मिल्कोस्कॅन सयंत्राचे खा.रक्षा खडसे यांच्या हस्ते उद्‌घाटन

vikas raksha khadse
---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । २७ एप्रिल २०२१ । केंद्र शासनाच्या राष्ट्रीय डेअरी डेव्हलपमेंट कार्यक्रमातंर्गत जळगाव दूध संघास मिल्कोस्कॅन सयंत्र (एफटी१) १०० टक्के अनुदानाने इंडीफास या कंपनीकडून उपलब्ध झाले आहे. या सयंत्राची किंमत ८५ लाख रुपये असून, या सयंत्राचे उद्‌घाटन आज (दि.२७) खासदार रक्षा खडसे यांच्या हस्ते व दूध संघाच्या चेअरमन मंदाकिनी खडसे यांच्या उपस्थितीत सकाळी ११ वाजता करण्यात आले. कार्यक्रमाला संघाच्या संचालिका शामल झांबरे व कार्यकारी संचालक मनोज लिमिये यांचीही उपस्थिती होती.

vikas raksha khadse

मिल्कोस्कॅन सयंत्राद्वारे दूधातील स्निग्धता, फॅट सोडून इतर घनघटक, प्रथिने, कबोर्दके, आम्लता या पोषकतत्वांच्या गुणवत्तेचे परीक्षण करण्यात येणार आहे. या पोषकतत्वासह दुधात होणारी भेसळदेखील पकडणे सहज शक्य होणार आहे. या अत्याधुनिक सयंत्रामुळे या दूग्धपरिक्षणासाठी लागणारा कालावधी अवघ्या ३० सेकंदावर आला असून, कमीतकमी म्हणजे २० मि.ली.दुधाच्या नमुन्यात हे परीक्षण होणार आहे. जुन्या परीक्षण पध्दतीपेक्षा या सयंत्रात कमीतकमी वेळात अचूक परिक्षण करणे शक्य झाले असून, मनुष्यबळात व वेळेतदेखील बचत होणार आहे.

---Advertisement---

मिल्कोस्कॅन सयंत्राची अचूकता उच्च कोटीची असल्याने दुध संघाकडे आलेल्या कच्च्या दुधावर वेळेत प्रक्रिया करणे शक्य होणार असून, या सयंत्रामुळे विकास दूधाची विश्वासार्हता अजून अचूक व प्रबळ होऊन जळगाव व इतर जिल्ह्यातील ग्राहकांना शुध्द व निर्भेळ दूध मिळणार आहे.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---